माजी कायदेमंत्री अश्विनीकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर “मी दिलेला राजीनामा म्हणजे, मी काही गैरकारभार केल्याचे सिद्ध करत नाही” असं म्हटलयं
तसेच मी पक्षाचा निष्ठावंत सैनिक आहे पक्षाने जो निर्णय घेतला त्याचे मी पालन केले आणि पक्षाची बदनामी थांबविण्यासाठी राजीनामा दिला असल्याचेही ते म्हणाले. 
गेले कित्येक दिवस देशभर गाजत असलेल्या रेल्वेगेट आणि कोलगेट भ्रष्टाचार प्रकरणांवरून रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आणि केंद्रीय कायदा व न्यायमंत्री अश्वनीकुमार यांनी अखेर शुक्रवारी आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे दिले. त्यानंतर आज(शनिवार) अश्विनीकुमार यांनी राजीनाम्याबद्दलची माध्यमांकडे आपली प्रतिक्रिया नोंदविली.  कोलगेट तपासाबाबतच्या स्थितीदर्शक अहवालात  फेरफार केल्याचा अश्विनीकुमार यांच्यावर आरोप आहे.