24 October 2020

News Flash

‘डायमंड प्रिन्सेस’ जहाजावरील तिसऱ्या भारतीयाला करोना संसर्ग 

जहाजावर करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या २१८ झाली आहे.

योकोहामा : जपानच्या ‘डायमंड प्रिन्सेस’ या क्रूझ जहाजावरील तिसऱ्या भारतीयाला करोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जपानमधील भारतीय दूतावासाने या बातमीला दुजोरा दिला आहे.

‘डायमंड प्रिन्सेस’ या क्रूझवर १३८ भारतीय आहेत. त्यातील दोन भारतीयांना करोना विषाणूची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले होते.    दरम्यान, जपान सरकारने जहाजावरील काही प्रवाशांना स्वतंत्र कक्षात स्थलांतरीत होण्यासाठी जहाज सोडण्यास परवानगी दिली आहे.

जहाजावर करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या २१८ झाली आहे. अजूनही हजारो प्रवाशांना जहाजावरील स्वतंत्र कक्षात ठेवले आहे. या जहाजावर ३७०० प्रवासी आहेत. त्यांत ‘सीओव्हीआयडी १९’ प्रकारच्या करोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

ज्या वयोवृद्धांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आणि ज्यांचे वय ८० च्या पुढे आहे, अशांना जहाजावरून आरक्षित केलेल्या ठिकाणी राहण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर एका बंदिस्त बसमधून शुक्रवारी त्यांना नियोजित ठिकाणी नेण्यात आले.

जपानचे वरिष्ठ आरोग्यमंत्री गाकू हाशिमोटो यांनी शुक्रवारी जहाजाला भेट दिली. ते म्हणाले, जहाजावरील प्रवाशांमध्ये संसर्गाची लक्षणे आढळल्यास त्यांची चाचणी करण्यात येईल. चाचणीत संसर्ग झाल्याचे आढळल्यास रुग्णालयात दाखल करण्यात येईल. तसेच संसर्ग नसलेल्या प्रवाशांना त्यांच्या मागणीनुसार जपान सरकारने राखून ठेवलेल्या ठिकाणी पाठवण्यात येईल.

जपानचे आरोग्यमंत्री काटसुनोबू काटो यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात दहा जण गंभीर अवस्थेत असून त्यांना अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवले आहे. प्रवासी आणि कर्मचारी यांना १४ दिवस एकमेकांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत त्यांना वेगळे ठेवण्यात येणार आहे.

तिघाही भारतीयांची प्रकृती स्थिर

‘डायमंड प्रिन्सेस’ या क्रूझवर १३८ भारतीय आहेत. त्यातील दोन भारतीयांना करोना विषाणूची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले होते. या तिघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे भारतीय दूतावासाच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे. दूतावास जहाजावरील भारतीयांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.

जहाजावरील ‘एकाकीपण’

’आम्ही जहाजावर आदर्श अशा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे. काही वेळा इंटरनेट सेवेत अडथळे येत असल्याने आपण दिलगीर आहोत असे जहाजाच्या कप्तानाने म्हटले आहे.

’डायमंड प्रिन्सेस जहाजासाठी असलेल्या सेवा मिळणे तांत्रिकदृष्टय़ा कठीण होते. असे असले तरी जास्तीत जास्त मोबाईल आणि लॅपटॉप इंटरनेटला जोडलेले आहेत.

’अनेक प्रवासी स्वतंत्र कक्षातील रिकामपणात मनोरंजन करून कंटाळा घालवण्यासाठी इंटरनेट वापरत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 4:10 am

Web Title: third indian tests positive for coronavirus on cruise ship diamond princess zws 70
Next Stories
1 चीनमध्ये ‘करोना’चे १,५०० बळी
2 ‘सीएए’विरोधी वक्तव्य: डॉ. काफील खान यांच्याविरुद्ध ‘रासुका’न्वये कारवाई
3 जम्मू-काश्मीरमधील निर्बंध मागे घ्या ; युरोपीय महासंघाची मागणी
Just Now!
X