चालत्या कारमध्ये युवतींवर बलात्कार झाल्याचे आणखी एक प्रकरणी गुडगावमध्ये बुधवारी रात्री घडले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. 
गुडगावमधील एम. जी. रोडवर असलेल्या एक पबमध्ये दोन युवती पार्टीसाठी गेल्या होत्या. बुधवारी रात्री पार्टी संपल्यावर तिथून बाहेर पडल्यावर त्या दोघींनी एका कारकडे लिफ्ट मागितली. कार काही अंतर पुढे गेल्यावर आणखी दोन पुरुष त्यामध्ये बसले. त्यानंतर एकूण तिघांनी या दोन युवतींवर चालत्या कारमध्ये बलात्कार केला, असे पूर्व विभागाचे पोलिस उपायुक्त माहेश्वर दयाल यांनी पत्रकारांना सांगितले.
दोन्ही युवतींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे, असेही पोलिसांनी सांगितले.