राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण ११२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. ९४ जणांना पद्मश्री, १४ जणांना पद्मभूषण आणि चार जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्मविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. Folk artist Teejan Bai, Djibouti's President Ismail Omar Guelleh, L&T chairman Anilkumar Manibhai Naik, and writer Balwant Moreshwar Purandare to be conferred with Padma Vibhushan by the President. pic.twitter.com/hkxAD2O3DJ — ANI (@ANI) January 25, 2019 पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, तीजन बाई, इस्माईल ओमर गुलेह, अनिल कुमार नाईक, बाबासाहेब पुरंदरे President to confer Padma Bhushan to 14 people including ISRO scientist Nambi Narayanan, former Lok Sabha Deputy Speaker Kariya Munda, Actor Mohanlal, journalist Kuldeep Nayyar (Posthumous), Indian mountaineer Bachendri Pal & Lok Sabha MP Hukmdev Narayan Yadav pic.twitter.com/fGBbTAVwCI — ANI (@ANI) January 25, 2019 पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी - इस्त्रोचे शास्त्रज्ञ नांबी नारायण, माजी लोकसभा उपाध्यक्ष कारीया मुंडा, अभिनेते मोहन लाल, भारतीय गिर्यारोहक बच्छेंद्री पाल, खासगा हुकमदेव नारायण यादव, पत्रकार कुलदीप नय्यर यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. President to confer Padma Shri to 94 people including veteran actor Kader Khan (posthumously), actor Manoj Bajpayee, footballer Sunil Chhetri, choreographer/director Prabhu Deva, cricketer Gautam Gambhir, singer Shankar Mahadevan and freestyle wrestler Bajrang Punia pic.twitter.com/ua5URjqXIP — ANI (@ANI) January 25, 2019 पद्मश्री पुरस्काराचे मानकरी - दिवंगत अभिनेते कादर खान, अभिनेते मनोज वाजपेयी, फुटबॉलपटू सुनील छेत्री, दिग्दर्शक प्रभू देवा, क्रिकेटपटू गौतम गंभीर, गायक शंकर महादेवन आणि बजरंग पुनिया एकूण ९४ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. Senior advocate Harvinder Singh Phoolka, Shadab Mohammad, Kabaddi player Ajay Thakur, Former Indian foreign secretary Dr S Jaishankar, and basketball player Prashanti Singh will also be conferred with Padma Shri. https://t.co/NJyJ5Xguqc— ANI (@ANI) January 25, 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. भारताला प्रत्येक पुरस्कार विजेत्याचा अभिमान आहे. तुम्ही देशाला आणि जगाला अधिक चांगले ठिकाण बनवले अशा शब्दात मोदींनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले.