जगातील सर्वांत वयस्क व्यक्ती कोण? आणि त्या व्यक्तीचं वय किती? असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. पेरु देशाच्या अँन्डिअन मॉऊन्टेन हा १२४ वर्षीय व्यक्ती सर्वात वयस्कर व्यक्ती ठरू शकतो. या व्यक्तीचा जन्म १९०० साली झाल. या देशाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिल्यास हाच व्यक्ती जगातील सर्वांत वयस्कर व्यक्ती ठरू शकतो. इंडियन एस्क्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ह्युआनुकोच्या मध्य पेरुव्हियन प्रदेशातील स्थानिक रहिवासी मार्सेलिनो आबाद १२४ वर्षांचे आहेत. यामुळे ते सर्वांत वयस्कर व्यक्ती ठरण्याची शक्यता आहे. “हुआनुकोमध्ये निसर्गाच्या सानिध्यात मार्सेलिनो अबाद टोलेंटिनो उर्फ ‘मशिको’ हे निरोगी जीवनशैलीचा आस्वाद घेत आहेत” असं सरकारने एका निवेदनात म्हटले आहे.

पेरूचे अधिकारी म्हणाले, आबाद यांच्या वयाबाबत स्वतंत्र पडताळणीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अर्ज करण्यास मदत करत आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला अशा व्यक्तींकडून अनेक अर्ज प्राप्त होतात जे सर्वात वयस्कर व्यक्ती असल्याचा दावा करतात.”

हेही वाचा >> Video : १२ नातवंड असलेल्या ५८ वर्षीय आजीबाईने रचला विश्वविक्रम! तब्बल ‘साडेचार तास’ केले प्लँक

आतापर्यंत सर्वांत वयस्कर कोण?

दाव्याची पडताळणी करण्यामध्ये अधिकृत कागदपत्रे आणि इतर पुरावे यांचा समावेश असेल, याची तज्ज्ञ टीमद्वारे छाननी केली जाईल. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सध्या १११ वर्षीय ब्रिटनमधील सर्वात वयस्कर जिवंत पुरुषाची यादी आहे. या आधी व्हेनेझुएलाचे ११४ वर्षीय व्यक्तीची नोंद होती. परंतु, त्यांचा आता मृत्यू झाला आहे. सर्वात वयोवृद्ध जिवंत महिला ११७ वर्षांची आहे, तर नोंद झालेली सर्वात वयस्कर व्यक्ती १२२ पर्यंत पोहोचली होती.

निरोगी आयुष्याचं रहस्य काय?

आबाद यांचा जन्म छग्ला या छोट्या गावात झाला होता. पेरूच्या सरकारने २०१९ मध्ये त्यांना सरकारी ओळखपत्र आणि पेन्शन मिळाली. ५ एप्रिल रोजी त्यांनी आपला १२४ वा वाढदिवस केला. त्यावेळी ते म्हणाले, आबाद म्हणतात की त्यांच्या आहारात फळे, कोकरुच्या मांसांचा समावेश आहे. पेरूच्या अँडियन समुदायांच्या पारंपरिक सवयीनुसार त्यांनाही कोकाची पाने चघळण्याची सवय आहे.