ट्रॅक्टर ट्रॉली कॅनॉलमध्ये पलटल्याने १४ महिलांसह एका बालकाचा मृत्यू

ट्रॅक्टर ट्रॉली कॅनॉलमध्ये पलटी झाल्याने झालेल्या भीषण अपघातात १४ महिलांसह एका बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना तेलंगणामध्ये घडली आहे.

drowned-death
प्रातिनिधिक छायाचित्र

ट्रॅक्टर ट्रॉली कॅनॉलमध्ये पलटी झाल्याने झालेल्या भीषण अपघातात १४ महिलांसह एका बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना तेलंगणामध्ये घडली आहे. या घटनेनंतर ट्रॅक्टरचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, महिला आणि मुलांना घेऊन एक ट्रॅक्टर ट्रॉली मुसी नदीवरील कॅनॉलच्या बाजूच्या रस्त्याने जात असताना तेलंगणातील वेमुलाकोंडा गावाजवळ ही दुर्घटना घडली. चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघातात १४ महिला आणि एका बालकाचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, ट्रॅक्टर चालक यातून बचावला असून तो फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून फरार चालकाला शोधण्यासाठी शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच जखमींवर चांगल्या पद्धतीचे उपचार करण्यात यावेत असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 14 women one child died after the tractor trolley they were travelling in skidded fell into the musi river canal

ताज्या बातम्या