पंजाबच्या फिरोजपूर येथे श्री गुरूग्रंथ साहिबच्या प्रतीचा अवमान केल्याच्या कथित आरोपावरून एका १९ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बक्षीस सिंह असं या तरुणांचे नाव आहे. या तरुणाला करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडीओ आता समोर आला असून पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द इंडियन एक्सप्रेसने पंजाब पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, बक्षीस सिंह याने बंदाला गावातील गुरुद्वारा परिसरात प्रवेश करत प्रवित्र धर्मग्रंथ मानल्या जाणाऱ्या गुरु ग्रंथ साहिबच्या प्रतीची काही पाने फाडण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या प्रकरणी दाखल तक्रारीनुसार, रात्री २ च्या सुमारास हा तरुण गुरुद्वारा परिसरात शिरला होता. त्यानंतर त्याने गुरु ग्रंथ साहिबच्या प्रती ठेवण्यात आलेल्या रुममध्ये प्रवेश केला. तसेच या ग्रंथाची काही पाने फाडण्याचा प्रयत्न केला. ही फाटलेली पाने घेऊन तो बाहेर पडताच, त्याने ‘प्रभू मला या लोकांपासून वाचवा’ अशी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला लंगरमधील एका व्यक्तीने बघितले. तसेच त्याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

हेही वाचा – Poonch Terror Attack : भारतीय वायुसेनेच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्याचा राहुल गांधींकडून निषेध; म्हणाले “हा भ्याड हल्ला…”

यासंदर्भात माहिती देताना पोलिसांनी सांगितले, “बक्षीस सिंहने गुरु ग्रंथ साहिबच्या प्रतीची काही पाने फाडली आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला काही लोकांनी पकडले. या घटेनेचे वृत्त गावात पसरताच, गावकरी इथे जमा झाले. त्यांनी या तरुणाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी या ठिकाणी पोहोचत तरुणाला सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र, मारहाणीदरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.”

महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले, त्यावेळी तो जिवंत होता, असा दावा गुरुद्वाराचे प्रमुख लखवीर सिंह यांनी केला आहे.

हेही वाचा – “अनोळखी नंबरहून फोन आला अन् म्हणाला तुझ्या बाबांना…” बंगळुरूतील महिलेने सांगितली ऑनलाइन फसवणुकीची नवी पद्धत

यासंदर्भात बक्षीस सिंहचे वडील लखविंदर सिंह यांनीही प्रतिक्रिया दिली. “माझा मुलगा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. काही वर्षांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. ज्यांनी माझ्या मुलाची हत्या केली, त्यांच्या पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, लखविंदर सिंह यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 year old youth beaten to death over sacrilege in punjab ferozepur spb