गुजरात पोलिसांच्या दहशतवादा विरोधी पथकाने भारतीय तटरक्षक दलाबरोबर राबवलेल्या संयुक्त मोहीमेद्वारे पाच पाकिस्तानी नागरिकांना सोमवारी तब्बल १७५ कोटी रुपयांच्या अंमलीपदार्था (हेरोईन)सह गुजरातमधील कच्छ किनारपट्टीतील मध्य समुद्री भागातून ताब्यात घेतले.

गुजरातच्या किनारपट्टीवर मोठ्याप्रमाणवर अंमलीपदार्थांची तस्करी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून भारतीय तटरक्षक दलास मिळाली होती. या माहितीवरून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात अंमली पदार्थांची तस्करी होण्यापासून रोखण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. तसेच, १६०० किलोमीटरच्या किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारच्या संकटांचा सामना करण्यास सज्ज देखील आहोत. गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने भारतीय तटरक्षक दलाबरोबर राबवलेल्या संयुक्त अभियानात पाच पाकिस्तानी नागरिकांना १७५ कोटी रुपयांच्या अंमलीपदार्थांसह अटक केली आहे. अशी माहिती गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी ट्विटरद्वारे दिली.