पीटीआय, नवी दिल्ली

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (यूएनएफपीए) च्या अहवालानुसार भारताची अंदाजे लोकसंख्या १४४ कोटी झाली आहे. २४ टक्के लोक ० ते १४ वयोगटातील आहेत. ‘यूएनएफपीए’चा जागतिक लोकसंख्या २०२४ अहवाल – ‘इंटरवोव्हन लाइव्ह, थ्रेड्स ऑफ होप: एंडिंग इनइक्वॅलिटी इन सेक्शुअल अँड रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ अँड राइट्स’ प्रसिद्ध करण्यात आला. त्यात ७७ वर्षांत भारताची लोकसंख्या दुप्पट होईल असा अंदाज आहे.

अहवालानुसार, १४४.१७ कोटी लोकसंख्येसह भारत जागतिक पातळीवर आघाडीवर आहे, तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनची १४२.५ कोटी लोकसंख्या आहे. भारतात २०११ मध्ये झालेल्या जनगणनेत १२१ कोटी लोकसंख्या होती. अहवालात असेही समोर आले आहे की भारतातील सुमारे २४ टक्के लोकसंख्या ०-१४ वयोगटातील आहे, तर १७ टक्के लोक १०-१९ वयोगटातील आहेत. अहवालाचा अंदाज आहे की २६ टक्के १०-२४ वयोगटातील आहेत तर ६८ टक्के १५-६४ वयोगटातील आहेत. भारतातील लोकसंख्येपैकी सात टक्के लोक ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. पुरुषांचे आयुर्मान ७१ वर्षे आणि महिलांचे ७४ वर्षे आहे.

हेही वाचा >>>Dubai Flood: दुबईची झाली डुबई! दोन वर्षांचा पाऊस एकाच दिवसात, वाळवंटात आला पूर, पाहा VIDEO

७७ वर्षांत भारताची लोकसंख्या दुप्पट होईल असा अंदाज युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (यूएनएफपीए) च्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

’ अहवालानुसार, २००६-२०२३ दरम्यान भारतातील २३ टक्के लोकांचे बालविवाह झाले.

’ भारतातील माता मृत्यूमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

’ ६४० जिल्ह्यांमध्ये केलेल्या अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की सुमारे एक तृतीयांश जिल्ह्यांनी माता मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण एक लाखांमागे ११४ ते २१० इतके आहे.