दिल्ली पोलिस दलातील सहाय्यक आयुक्त (एसपी) यशपाल सिंह यांचा मुलगा वकील लक्ष्य चौहानची त्याच्याच दोन मित्रांनी हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. लक्ष्य चौहान दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात वकिली करत होता. विकास भारद्वाज आणि अभिषेक या त्याच्या दोन मित्रांनी पैशांच्या व्यवहारातून त्याची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. हत्या करण्यासाठी आरोपींनी लक्ष्यला हरियाणामधील सोनीपत येथे एका लग्नासाठी नेले, तिथे त्याची निर्घुन हत्या करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी लक्ष्य चौहान विकास आणि अभिषेक यांच्यासह एका लग्नासाठी सोनिपतला गेला होता. मात्र दुसऱ्या दिवशी लक्ष्य घरी न परतल्यामुळे वडील आणि पोलिस आयुक्त यशपाल सिंह यांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. यानंतर पोलिस दलाने कसून तपास सुरू केला.

“शुद्धीवर आले तेव्हा तो माझ्यावर बलात्कार करत होता आणि..”, मुंबईतल्या २१ वर्षीय मुलीने पोस्ट करत सांगितली आपबिती

पोलिसांना तपासात आढळले की, लक्ष्य आणि विकास भारद्वाज यांच्यात पैशांच्या व्यवहाराला घेऊन वाद टोकाला गेले होते. यासाठी विकास भारद्वाजने लक्ष्य चौहानची हत्या करण्याचा कट रचला. विकास भारद्वाजने आरोप केला की, लक्ष्य चौहानने त्याच्याकडू कर्ज घेतले होते आणि ते परत देण्यास तो टाळाटाळ करत होता. यामुळे दोघांमध्ये भांडण होत होते.

पोलिसांनी एक आठवडा चौकशी केल्यानंतर अभिषेकला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने सांगितले की, लक्ष्य चौहानला लग्नात येण्यासाठी आमंत्रित केले. लग्न झाल्यानंतर तिघेही निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मुनक कालव्यावर फिरण्यासाठी गेले. तिथे संधी पाहून आरोपी विकास आणि अभिषेकने लक्ष्य चौहानला कालव्यात ढकलून दिले आणि तिथून पळ काढला. सध्या पोलिस विकास भारद्वाजचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acps son missing after wedding delhi police suspect friends killed him threw body in canal kvg
First published on: 27-01-2024 at 18:11 IST