आपल्या सहकाऱ्यावर बलात्कार केल्याप्रकरणी हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कोईम्बतूर एअरफोर्स कॉलेजमध्ये ट्रेनिंगसाठी आलेल्या या अधिकाऱ्याला बलात्काराच्या आरोपाखाली बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात देशभरातून एकूण ३० हवाई दल अधिकारी कोईम्बतूर एअरफोर्स कॉलेजमध्ये ट्रेनिंगसाठी आले होते. पीडित २९ वर्षीय महिला अधिकाऱी १० सप्टेंबरला बास्केटबॉल खेळताना जखमी झाली होती. तिचा पाय जखमी झाला होता. यामुळे झोपण्यापूर्वी तिने पेनकिलर घेतलं होतं.


महिला अधिकाऱ्याने केलेल्या आरोपानुसार, मध्यरात्री जेव्हा जाग आली तेव्हा तिच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते आणि आरोपी अधिकारी तिच्या शेजारी झोपलेला होता. यावेळी त्याच्या अंगावरही कपडे नव्हते.

Nagpur, IPS, wife,
नागपूर : आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीची छेड काढणे पडले महागात
nalasopara, Massive Fire at Dwarka Hotel, Fire at Dwarka Hotel nalasopara, fire in nalasopara, fire in nalasopara hotel, marathi news, fire brigade fire news,
नालासोपाऱ्यात गॅस गळतीमुळे भीषण आग, तीन जण जखमी; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री

यानंतर आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही असा महिला अधिकाऱ्याचा आरोप आहे. यानंतर तिने कोईम्बतूर शहराच्या पोलीस आयुक्तांकडे आणि गांधीपूरम महिला पोलिसांकडे तक्रार केली. तपासाअंती लेफ्टनंट असणाऱ्या आरोपी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली.

आरोपीला रविवारी सकाळी दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आलं. आरोपीच्या वकिलांनी कोईम्बतूर पोलीस अटक करु शकत नाही असं प्रतिज्ञापत्र सादर केलं. दरम्यान पोलिसांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे.