पीटीआय, नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन राजस्थानचे प्रभारीपद सांभाळण्यास इच्छुक नाहीत. या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती करणारे पत्र त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवले आहे. सप्टेंबरमध्ये राजस्थानच्या आमदारांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात ते अपयशी ठरले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ राजस्थानमध्ये दाखल होणार आहे. त्याआधीच माकन यांनी ही भूमिका घेतल्याने त्याला विशेष राजकीय महत्त्व आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ८ नोव्हेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात माकन यांनी २५ सप्टेंबरच्या राजस्थानमधील पक्षांतर्गत घडामोडींचा उल्लेख केला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा समर्थक गट आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या समर्थक गटात आरोप-प्रत्यारोप होत असल्याने सप्टेंबरमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यासाठी माकन आणि खरगे केंद्रीय निरीक्षक म्हणून जयपूरला गेले होते. मात्र, विधिमंडळ पक्षसदस्यांची बैठक होऊ शकली नाही. दरम्यान, माकन यांना कामगार संघटना आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून दिल्लीत लक्ष केंद्रित करायचे असल्याचे समजते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay maken relieved charge of rajasthan letter congress party president mallikarjun kharge ysh
Show comments