प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन याचा सापेक्षतावादाचा सिद्धांत आपल्या संपूर्ण विश्वात इतरत्रही खरा ठरला असल्याचा दावा जपानी संशोधकांनी केला आहे. आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताची शताब्दी साजरी होत असताना गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वानंतर आइनस्टाइनच्या सद्धांतिक संशोधनावर शिक्कामोर्तब होण्याची ही या वर्षांतील दुसरी वेळ आहे.
वैज्ञानिकांनी तीन हजार दीíघकांचा त्रिमिती नकाशा तयार केला असून या दीíघका पृथ्वीपासून १३ अब्ज प्रकाशवष्रे दूर आहेत. आइनस्टाइनचा सामान्य सापेक्षतावाद सिद्धांत हा विश्वात सर्वदूर खरा ठरताना दिसत आहे.
विश्व प्रसरण पावत आहे याचा शोध १९९० मध्ये लागल्यानंतर नेमके हे प्रसरण का होते आहे, याचा उलगडा होत नव्हता. विश्वाच्या प्रसरणामागे कृष्ण ऊर्जा असावी किंवा आइनस्टाइनचा सामान्य सापेक्षतावादाचा सिद्धांत असावा असे मानले जाते. गुरुत्व अवकाश व काळाच्या मितीत प्रवास करताना तुटत नाही तर वाकते.
आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांत पडताळण्यासाठी कावली इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्स अँड मॅथेमॅटिकस व जपानचे टोकियो विद्यापीठ यांनी तीन हजार दूरस्थ दीíघकांचा वेग व समूहीकरणाचा अभ्यास केला. त्यात आइनस्टाइनचे म्हणणे बरोबर सिद्ध झाले आहे. विश्वात अगदी दूरवरही सापेक्षतावादाचा सिद्धांत लागू पडतो. त्यामुळे विश्वाचे प्रसरण होते आहे व त्याचे स्पष्टीकरण वैश्विक स्थिरांकाच्या माध्यमातून करता येईल. सापेक्षतावादाच्या सिद्धांतात आइनस्टाइनने वैश्विक स्थिरांक ही संकल्पना मांडली होती. आजपर्यंत कुणी केली नव्हती अशी सापेक्षतावादाची चाचणी आम्ही घेतली आहे व या सिद्धांताच्या शतकपूर्तीनिमित्ताने हे मोठे यश आहे, असे कावली आयपीएमयूचे संशोधक टेप्पेई ओकुमुरा यांनी सांगितले आहे. विश्वात अगदी दूरवर सामान्य सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा पडताळा घेण्यासाठी बारा वर्षांपूर्वी हा प्रयोग सुरू केला होता. आज त्याचे निष्कर्ष हाती आले आहेत, असे स्विनबर्न तंत्रज्ञान विद्यापीठाचे कार्ल ग्लेझब्रुक यांनी सांगितले. आजपर्यंत कुणीही आपल्यापासून १० अब्ज प्रकाशवष्रे दूर असलेल्या दीíघकांना सापेक्षतावादाचा सिद्धांत लागू करून पाहण्याचा प्रयत्न केला नव्हता पण आम्ही तोकेला त्यात एमएमओएस म्हणजे फायबर मल्टी ऑब्जेक्ट स्पेक्ट्रोग्राफ या सुबारू टेलिस्कोपवरील यंत्रणेचा उपयोग १२.४ ते १४.७ अब्ज प्रकाशवष्रे दूर असलेल्या दीíघकांचे विश्लेषण करण्यासाठी झाला आहे.

loksatta analysis about chatbot and its use created by artificial intelligence
विश्लेषण : चॅटबॉट चक्क भविष्य सांगणार? अमेरिकेत सुरू आहे अद्भुत संशोधन…
Dr. Jayant Narlikar big bang theory model, 60 Years of Dr. Jayant Narlikar s big bang theory model,
या मराठी संशोधकाने ६० वर्षांपूर्वी उपस्थित केला होता विश्वनिर्मितीच्या ‘बिग बँग’ सिद्धान्तावर प्रश्न…
Moon Astrology chandrama in kundali
Moon Astrology: मूड स्विंग्समुळे तुम्ही वैतागला आहात का? चंद्राच्या प्रभावामुळे बिघडते- सुधारते व्यक्तीचे वर्तन
The return of Intel DRAM chip manufacturing Decision to stop production
चिप-चरित्र: इंटेलचं पुनरागमन
pm modi remark on mahatma gandhi
उलटा चष्मा : विश्वगुरूंची खंत रास्तच!
albert einstein,
… आणि आइनस्टाइनचा सापेक्षतावाद पुराव्यासह सिद्ध झाला!
kutuhal buks
कुतूहल: रॉडनी अॅलन ब्रुक्स
microplastics in human testicles
पुरुषांच्या अंडकोषामध्ये आढळले मायक्रोप्लास्टिक्स; प्रजनन क्षमतेवर होणार परिणाम?