रशियातील विरोधी पक्षातील नेते आणि राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे विरोधक एलेक्सी नवाल्नी (Alexei Navalny) यांचे यामालो-नेनेट्स प्रांतातील तुरुंगात मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. फेडरल पेनिटेंशरी सेवेच्या वेबसाईटने दिलेल्या निवेदनानुसार, यामालो-नेनेट्स स्वायत्त जिल्ह्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी एलेक्सी नवाल्नी पाय मोकळे करण्याासाठी गेले होते. थोडं फिरून आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यानंतर ते अचानक कोसळले, अशी बातमी रॉयटर्सने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवेदनात पुढे म्हटले गेले की, एलेक्सी नवाल्नी कोसळल्यानंतर लगेचच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. मात्र नवाल्नी यांना वाचवता आले नाही. मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

पुतीन यांच्या कट्टर विरोधकावर अंतर्वस्त्रांवर विष शिंपडून विषप्रयोग

ॲलेक्सी नवाल्नी तुरुंगात का होते?

ॲलेक्सी नवाल्नी हे व्लादिमीर पुतीन यांचे राजकीय विरोधक आहेत. ते सध्या तुरुंगात होते. डिसेंबर २०२३ मध्ये त्यांना मॉस्कोपासून खूप दूर असलेल्या तुरुंगात हलवण्यात आले होते. मार्च महिन्यात रशियामध्ये अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. याच कारणामुळे ॲलेक्सी नवाल्नी हे मॉस्को शहरापासून जास्तीत जास्त दूर असावेत, म्हणून तेथील प्रशासनाने हा निर्णय घेतला असावा, असे म्हटले गेले होते.

ॲलेक्सी नवाल्नी यांना एकूण १९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार, निधीचा अपव्यय तसेच अन्य आरोप करण्यात आले होते. नवाल्नी यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले होते. राजकीय तसेच सार्वजनिक जीवन उद्ध्वस्त व्हावे, यासाठी माझ्यावर असे आरोप करण्यात आलेले आहेत, असा दावा नवलेनी यांनी केला होता.

पुतीन यांचे कडवे विरोधक ॲलेक्सी नवाल्नींची पुतीन यांच्याशी टक्कर घेण्याची त्यांची क्षमता किती?

ॲलेक्सी नवाल्नी कोण होते?

रशियामधील प्रसिद्ध वकील आणि भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ते अशी ॲलेक्सी नवाल्नी यांची ओळख होती. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कडवे टीकाकार म्हणून ते पुढे प्रसिद्धीस आले. १९७६ मध्ये जन्म झालेल्या नवाल्नी यांनी मॉस्कोतील पीपल्स फ्रेंडशिप विद्यापीठात कायद्याची पदवी घेऊन उत्तीर्ण झाले. २००० मध्ये रशियन युनायटेड डेमोक्रॅटिक पक्ष असलेल्या ‘याब्लोको’मध्ये ते सामील झाले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा एककल्ली राज्य कारभार, हुकूमशाही पद्धती आणि भ्रष्टाचार यांच्याविरोधात त्यांनी पुढे चळवळी सुरू केल्या. पुतिन यांच्या निरंकुश व्यवस्थेला लगाम घालण्याचे काम नवाल्नी करू पाहत होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alexei navalny jailed russian opposition leader dead prison service kvg
First published on: 16-02-2024 at 17:46 IST