राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेला आंदोलनजीवी हा शब्द मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर चांगलाच चर्चेत आहे. सोमवारी मोदींनी राज्यसभेत दिलेल्या भाषणामध्ये शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. ‘आंदोलन मागे घ्या आणि चर्चेस या’, असं मोदी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना म्हणाले. मात्र त्याचवेळी त्यांनी आता आंदोलनजीवी म्हणजे व्यावसायिक आंदोलक उदयास आले असून तेच सर्व आंदोलनांमध्ये दिसत आहेत. हे परोपजीवी आंदोलक प्रत्येक आंदोलनावर पोसले जात आहेत, अशी टीकाही केली. मोदींनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या टीकेमुळे विरोधकांपासून ते शेतकरी आंदोलनाला समर्थन करणाऱ्यांनी या शब्दावरुन मोदींवर टीका केली आहे. असाच एक हॅशटॅग सध्या सोशल नेटवर्किंगवर ट्रेण्ड होताना दिसत आहे. #आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं असा हा हॅशटॅग असून या हॅशटॅगवर ६० हजारांहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. हा बुधवारी (१० फेब्रुवारी २०२१) देशातील टॉप ट्विटर ट्रेण्ड ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंदोलनजीवी या शब्दामधून आंदोलन करणाऱ्यांना टोला लगावल्यानंतर आता आंदोलनाला समर्थन करणाऱ्यांनी आम्ही आंदोलक असलो तरी खोटे दावे आणि आश्वासने देणारे नाहीत असं सांगणारा हा हॅशटॅग ट्रेण्ड केलाय. शेतकरी आंदोलनातील फोटो, व्हिडीओ आणि वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स या हॅशटॅगच्या माध्यमातून आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांनी शेअर करत पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. जुमला शब्द आधी अमित शाह यांनी वापरलेला २०१४ साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने लोकसभा निवडणुका जिंकल्या आणि मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर २०१५ साली एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदा जुमला या शब्दाचा वापर केला होता. परदेशातील काळापैसा भारतात आणला तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करता येतील हा निवडणुकीच्या प्रचारामधील जुमला म्हणजेच खोटं आश्वासन होतं असं शाह यांनी ५ फेब्रुवारी २०१५ रोजी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर विरोधकांनी अनेकदा यावरुन भाजपावर टीका केल्याचे पाहायला मिळालं आहे. सध्या ट्रेण्ड होत असणारा हॅशटॅगही याच शब्दाची आठवण करुन देणारा आहे. पाहुयात व्हायरल झालेले काही ट्विट्स. १) शेतकरी एकजुटीचा विजय असो. EKTA ZINDABAD;) Must Watch Young, old, bibi, baba, Haryanvi, Panjabi, Hindu, Sikh all with the same energy. They may try to divide us but we stand together.#आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं pic.twitter.com/b2ayVhqOoq — Vishal Lochab Farmer (@VishalLochab6) February 9, 2021 २) तर आम्हाला गर्व आहे #आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं ਸਾਡੇ ਆਂਦੋਲਨਜੀਵੀ Bhagat Singh is our Andolanjivi N we are proud of pic.twitter.com/mRJPkEAVRm — Ravi barmi (@ravi_tatla) February 9, 2021 ३) वेगवेगळ्या ठिकाणांवरील आंदोलन #FarmersProtests across Haryana-UP and not limited to Punjab only. #आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं pic.twitter.com/C9vLu2xti4 — Vijay Malik A+ (@VijaySmalik) February 9, 2021 ४) भाषणावरुन टोला I am watching Modi's speech in Parliament and my mom is like "Achcha to yahan se seekh rahi ho jhoot bolna baatein banana"#आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं — Meena (मीना) (@Iam_meena22) February 9, 2021 ५) दोन्ही वक्तव्ये RSS never supported 'The Indian independence movement'. RSS never opposed 'British Rule' in India. So the 'sanghis' don't know the power of the movement. The power of the Movement always stands ahead to the 'Jumlas '. We can say proudly :#आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं pic.twitter.com/WEQN3c9xhR — BAJPAI,PANKAJ,IN(@pankajbajp16) February 9, 2021 ६) आंदोलन हेच लोकशाहीचं सौंदर्य आहे Protest is the beauty of the democracy. Don't treat them as rivals.#आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं pic.twitter.com/6I8CJ34TT3 — DrSyed Md Sabir (@drsabirsyed) February 9, 2021 ७) समर्थन आंदोलनाला When victory is stubborn, wounds do not matter. #FarmerLivesMatter#आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं pic.twitter.com/9atd0umGFx — NomanQasmi (@NomanQasmi8) February 9, 2021 ८) हे सुद्धा आंदोलकच Modi insulted all these great personalities of the world. #आंदोलनजीवी_हूं_जुमलाजीवी_नहीं pic.twitter.com/vaXHW6ABHg — Hansraj Meena (@HansrajMeena) February 9, 2021 ९) तुम्ही सुद्धा आंदोलनजीवी? Always stand with farmers.#आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं pic.twitter.com/830g8wUheC — Ankit shrivastava. (@ankitbhojpur426) February 9, 2021 १०) काहींनी हा हिशेबही काढला #Flightjeevi Prime Minister Narendra Modi visited 58 nations in the year 2015 costing the exchequer Rs 517.82 crore,@HansrajMeena#आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं — Andolanjeevi RAJU UPMAN (@RAJUUPMAN14) February 9, 2021 ११) आम्ही शेतकऱ्यांसोबतच Save our Farmers Save our Nation.. We stand with farmers 1-#FarmersAboveReligiousHate 2- #किसानो_अब_रेल_रोको#FarmersProtests#राजेश_पायलट#आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं @Ravimeenafrom pic.twitter.com/fqz5UXySL5 — #बेरोजगारों_की_आवाज़ (@Ravimeenafrom) February 10, 2021 १२) टॉप ट्रेण्ड National top trend.#आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं#आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं — Ravinder Bishnoi (@RaviiBishnoii) February 10, 2021 दरम्यान या हॅशटॅगबरोबरच अनेकांनी इतर शब्दांच्या पुढे जीवी शब्द लावत नवीन शब्द शोधून काढल्याचेही चित्र दिसत आहे. सोशल नेटवर्किंगवर अशापद्धतीचे अनेक ट्विट पाहायला मिळत आहेत.