जम्मू-काश्मीरमधील हंडवारा पोलिसांनी भारतीय लष्कराच्या ३२ आरआर आणि सीआरपीएफच्या ९२ बटालियनसोबत राबवलेल्या संयुक्त मोहीमेत लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यास अटक केली आहे. यावेळी या दहशतवाद्याकडून शस्त्र व दारूगोळा देखील जप्त करण्यात आला आहे. Handwara Police along with Indian Army's 32 RR and 92 Battalion of CRPF arrested one terror associate of Lashkar-e-Toiba (LeT). Arms and ammunition recovered from his possession: Jammu and Kashmir Police — ANI (@ANI) September 26, 2020 या अगोदर १९ सप्टेंबर रोजी जम्मूमधील राजौरी जिल्ह्यातून लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पकडण्यात जवानांना यश आलं होतं. तेव्हा देखील त्या दहशतवाद्यांकडून रोख रक्कमेसह मोठ्याप्रमाणावर दारूगोळा व शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला होता. काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचा संपूर्णपणे नायनाट करण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलीस व लष्करी जवानांकडून सातत्याने विशेष मोहीम राबवली जात आहे.