कर्नाटकमधील भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी संविधानात दुरुस्ती करण्याचे विधान केल्यामुळे भाजपावर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे भाजपाने अनंतकुमार हेगडे यांचे आगामी निवडणुकीसाठी तिकीटच कापले. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपाच्या उमेदवाराने संविधान बदलण्याची भाषा वापरली. त्यामुळे काँग्रेसला मात्र चांगलाच दारूगोळा मिळाला आहे. ३० मार्च रोजी राजस्थानच्या नागौर येथे एका सभेत बोलत असताना भाजपाच्या उमेदवार ज्योती मिर्धा म्हणतात, “देशहितासाठी अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी संविधानात बदल करावे लागतात. जर संविधानात काही बदल करायचे असतील तर तुमच्यापैकी अनेक लोकांना माहीत आहेच की, दोन्ही सभागृहात म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेत बहुमत असणे आवश्यक आहे.”

ज्योती मिर्धा यांच्या विधानाचा व्हिडिओ काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यावरील कॅप्शनमध्ये लिहिले, “या आहेत राजस्थानच्या नागौरमधून भाजपाच्या तिकीटावर लढणाऱ्या ज्योती मिर्धा. त्या म्हणत आहेत की, संविधान बदलण्यासाठी आम्हाला दोन्ही सभागृहात बहुमत हवे आहे. भाजपाचे खासदार अनंत हेगडेही हेच म्हणत होते की, आम्हाला ४०० हून अधिक जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलू. यावरून स्पष्ट होते की, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान आणि लोकशाहीचा द्वेष करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान निकामी करून भाजपाला सर्वसामान्यांचे अधिकार खेचून घ्यायचे आहेत.”

Politics, ED, CBI Probe and BJP
भ्रष्टाचार विरोधी कारवाई सुरू झालेले २५ नेते भाजपात, २३ जणांना थेट दिलासा!
What Devendra Fadnavis Said?
“आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं, मी त्यांचे आभार मानतो”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत
Ambala Divisional Commissioner Renu Phulia
महिला आयएएस अधिकाऱ्याने २० वर्षांपूर्वीची स्थगिती उठवली, नवरा आणि मुलाने लगेचच खरेदी केला भूखंड
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

‘संविधानातील हिंदुविरोधी बदल काढण्यासाठी घटनादुरुस्ती करणार’, भाजपा खासदाराचे विधान

ज्योती मिर्धा यांचा प्रचारसभेचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात त्या म्हणताना दिसतात की, “लोकसभेमध्ये भाजपा आणि एनडीएचं बहुमत आहे. लोकसभेत आपल्याला काहीच अडचण नाही. पण राज्यसभेत आजही आपले बहुमत नाही. जर यावेळी तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार आले तर…”

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ज्योती मिर्धा यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. “अनंत हेगडे यांच्यानंतर आता एक एक जण आपले खरे रुप दाखवत आहे. आता आणखी एका उमेदवाराने जाहीरपणे संविधान बदलण्याचा मानस व्यक्त केला आहे. आणखी किती उमेदवार सत्य उघड करण्यास नकार देत आहेत?”, अशी टीका शशी थरूर यांनी केली. थरूर यांच्या विधानाचा आधार घेत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माध्यम विभागाचे प्रभारी जयराम रमेश म्हणाले की, हे सर्व एका महासूत्रधाराने ठरविल्याप्रमाणे होत आहे. हे एक ठरवून केलेली योजना आहे.

‘हिंदूंवर अन्याय करणारी घटना बदलण्याची गरज’; आमदाराच्या वक्तव्यावर भाजपानं झटकले हात, मागितलं स्पष्टीकरण!

शशी थरूर यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना मिर्धा म्हणाल्या की, माझ्या माहितीनुसार भाजपा लोकशाही मूल्य जपत देश आणि सामान्य जनतेच्या सेवेसाठी काम करत आहे. त्यासाठी संविधान बदलण्याची गरज भासली तर तेही करू. नुकतेच मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात महिला आरक्षणाच्या निमित्ताने १०६ वी दुरुस्ती करण्यात आली होती. ज्यामुळे संबंध महिला वर्गाला दिलासा देण्यात आला.