नवी दिल्ली : गुजरातच्या सुरत मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी तसेच, पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आल्यानंतर अन्य ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यावर काँग्रेसने घणाघाती टीका केली असून पराभवाच्या भीतीने ‘मॅचफििक्सग’ करण्यात आल्याचा आरोप केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातमधील २६ जागांसाठी ७ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. सोमवार २२ एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेर दिवस होता. काँग्रेसचे निलेश कुंभोणी यांच्या तीन अनुमोदकांनी आपण अनुमोदक नसल्याचे प्रतिज्ञापत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिले. कुंभोणी यांनी तीनही अनुमोदकांना जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र ते गैरहजर राहिले. त्यानंतर त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. कुंभोणी यांनी आपल्या अनुमोदकांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे काँग्रेसने याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचे चार अनुमोदक स्वाक्षऱ्या आपल्या नसल्याचा दावा करतात. अन्य पक्षांचे उमेदवार, अपक्ष आपली उमेदवारी मागे घेतात. हा योगायोग नव्हे. त्यामुळे सुरतमधील निवडणुकीला स्थगिती देऊन नव्याने निवडणूक घ्यावी, अशी लेखी मागणी करण्यात आल्याचे काँग्रेस प्रवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक; मुस्लिमांना संपत्तीचे फेरवाटप करण्याच्या आरोपावरून संतप्त प्रतिक्रिया, आयोगाकडे तक्रार

 ‘उद्योजकांच्या नाराजीमुळे भाजपचा डाव

पंतप्रधान मोदी यांच्या ‘अन्याय काळा’त सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजक नाराज आहे. त्यांच्या रागामुळेच १९८४पासून सातत्याने जिंकत असलेल्या सुरतच्या जागेवर भाजपने हे मॅचफििक्सग केले, असा आरोप काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला. आपल्या निवडणुका, आपली लोकशाही आणि बाबासाहेब आंबेडकर यांची घटना या सर्वांपुढेच अस्तित्वाचा प्रश्न आहे. ही सर्वात महत्त्वाची निवडणूक आहे, असे रमेश यांनी आपल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिले आहे.

भाजपचे पहिलेच उमेदवार

– २९५१पासून आजतागायत केवळ ३५च्या आसपास उमेदवार लोकसभेमध्ये बिनविरोध निवडून गेले आहेत.

– यापूर्वी २०१२ साली समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव कनोज मतदारसंघातील पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या.

– यशवंतराव चव्हाण, फारूख अब्दुल्ला, हरेकृष्ण महताब, टी. टी. कृष्णामचारी आदी अन्य नेते यापूर्वी निवडणूक न लढताच लोकसभेत गेले होते. – लोकसभेत बिनविरोध निवडून जाणारे दलाल हे भाजपचे पहिलेच उमेदवार असल्याचे सांगितले जाते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp wins surat lok sabha seat unopposed after congress candidate rejected zws
First published on: 23-04-2024 at 02:43 IST