पीटीआय, ढाका : बांगलादेशची राजधानी ढाक्यामधील एक सात मजली व्यावसायिक इमारत स्फोटाने हादरली. त्यामध्ये किमान १७ जण ठार झाले आणि शंभरपेक्षा जास्त लोक जखमी झाले अशी माहिती पोलिसांनी दिली. स्फोटानंतर लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाची अनेक पथके घटनास्थळी रवाना झाली. स्थानिक वेळेनुसार दुपारी पावणेपाच वाजता हा स्फोट झाला. ही इमारत जुन्या ढाक्यामध्ये गुलिस्तान या गर्दीच्या भागात आहे.

हा स्फोट इमारतीच्या तळमजल्यावर झाला आणि पहिल्या दोन मजल्यांचे बरेच नुकसान झाले अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही घटना अपघाती असावी आणि त्यामध्ये कोणताही घातपात नसावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पण त्या शक्यतेचाही तपास केला जाईल असे सांगण्यात आले. स्फोटाचे कारण अधिकृतरित्या समजू शकलेले नाही. मात्र, इमारतीमध्ये बेकायदेशीरपणे साठवलेल्या रसायनांमुळे हा स्फोट झाला असावा असा संशय आहे.

JDS leader HD Revanna arrested
मोठी बातमी! जेडीएसचे नेते एचडी रेवण्णा यांना एसआयटीकडून अटक
Terrorist Attack
Militants Open Fire in J&K : भारतीय वायूसेनेच्या वाहनांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकजण शहीद
Heather Pressdee killer nurse
‘नर्स आहे की सैतान?’ इन्सुलिनचा डोस देऊन घेतला १७ रुग्णांचा जीव, मिळाली ७०० वर्षांची शिक्षा
Nepal Notes
नेपाळच्या पुन्हा कुरापती! लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी यांचा समावेश असलेल्या नव्या नोटा जाहीर करणार

आधी मला भूकंप झाला असे वाटले. या स्फोटामुळे संपूर्ण सिद्दीक बाजार हादरला. स्फोटानंतर मला इमारतीसमोरील रस्त्यावर २० ते  २५  जण पडलेले दिसले. ते गंभीर जखमी झाले होते आणि रक्तस्राव होत होता. ते मदतीसाठी ओरडत होते. काही लोक घाबरून सैरावैरा पळत होते.

– सफायत हुसैन, प्रत्यक्षदर्शी