शीख धर्माची पगडी घातलेल्या पश्चिम बंगालच्या एका पोलीस अधिकाऱ्याला भाजपा कार्यकर्त्यांनी खलिस्तानी म्हटलं आहे. संदेशखाली येथील महिला लैंगिक अत्याचार प्रकरणाविरोधात भाजपाने आवाज उठवला. भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करत होते. त्यावेळी त्यांना आयपीएस अधिकारी जसप्रीत सिंग यांनी रोखलं. ज्यानंतर पोलीस अधिकारी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. माझं कर्तव्य आणि माझा धर्म एकत्र करु नका असं या अधिकाऱ्याने भाजपाला सुनावलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय घडलं?

पोलीस अधिकाऱ्याला त्याच्या पगडीमुळे खलिस्तानी म्हटलं गेल्याने ते अधिकारी अस्वस्थ झाले आहेत. तसंच पश्चिम बंगालचे विरोधीपक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वात आंदोलन करणाऱ्या भाजपा नेते, कार्यकर्त्यांच्या गटाला त्या अधिकाऱ्याने प्रत्युत्तरही दिलं आहे. लोकांना त्यांच्या पेहरावावरुन टाईपकास्ट करु नका असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. एवढंच नाही तर माझा धर्म माझ्या कर्तव्यापासून वेगळा ठेवा असंही या अधिकाऱ्याने भाजपा कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. पश्चिम बंगालमधल्या सत्ताधारी तृणमूलमध्ये आणि विरोधात असलेल्या भाजपा यांच्यात संघर्ष झाला. सोमवारी २४ परगणा या ठिकाणी ही घटना घडली.

हे पण वाचा- पगडी घातलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला भाजपा कार्यकर्त्यांनी खलिस्तानी संबोधलं? काँग्रेसने शेअर केला ‘तो’ VIDEO

‘मी पगडी घातल्यामुळे ते मला खलिस्तानी म्हणत आहेत’

या व्हिडिओमध्ये आयपीएस अधिकारी जसप्रीत सिंह दिसत आहेत. ते म्हणतात की, ‘मी पगडी घातल्यामुळे तुम्ही मला खलिस्तानी म्हणत आहात. तुमची हिम्मत आहे का? पोलिसाने पगडी घालून ड्युटी केली तर तो खलिस्तानी होतो का? ही तुमची पातळी आहे का?’

माझ्या धर्मावर बोलू नका

व्हायरल व्हिडिओमध्ये आयपीएस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, “तुम्ही मला खलिस्तानी म्हणत आहात, मी तुमच्यावर गुन्हा दाखल करेन. मी तुमच्या धर्मावर बोललो नाही तर तुम्ही कसे बोलू शकता? पगडी घातलेल्या आणि कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तुम्ही खलिस्तानी म्हणत आहात”, असंही आयपीएस अधिकारी व्हीडिओमध्ये म्हणताना दिसत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Called khalistani ips officer hits back at bengal bjp leaders keep my religion out scj
First published on: 21-02-2024 at 18:31 IST