भारतातून निर्यात करण्यात आलेल्या मक्याच्या साठय़ात अ‍ॅफ्लॅटॉक्सिन हे रासायनिक द्रव्य आढळल्याने कॅनेडियन अन्न निरीक्षण संस्थेने तो नाकारला आहे. या रसायनामुळे कोंबडय़ा व जनावरांना रोग होतात. त्यामुळे मक्याचा हा साठा रोखला आहे असे सांगण्यात आले. हा मका सार्वजनिक आरोग्यासही धोकादायक आहे असे सांगून संस्थेच्या नोटिशीत म्हटले आहे, की भारतातील ऑरगॅनिक मक्यात रासायनिक अंश आढळल्याने मक्याचा साठा रोखण्यात आला आहे. मका कॅनडात आल्यानंतर आयातदारांनीही त्याची नमुना तपासणी करणे आवश्यक असल्याचे संस्थेने सांगितले.