scorecardresearch

लैंगिक संबंधांना नकार देणाऱ्या प्रेयसीचा केला खून; रक्ताने माखलेल्या कपड्यात रस्त्यावर बसून राहिला; चित्रपटात शोभेल असं थरारनाट्य

कन्नम्मा रडत असतानाचे आवाज तिच्या शेजाऱ्यांनी ऐकले आणि त्यांनी राजाला तिच्या घरातून हाकलून लावलं. मात्र, काही वेळानंतर रात्री उशिरा सगळे झोपल्यानंतर राजा पुन्हा तिच्या घरी आला.

(संग्रहित छायाचित्र)

चेन्नई पोलिसांनी बसस्टँड वर रक्ताने भरलेल्या कपड्यांमध्ये बसलेल्या एका तरुणाला शुक्रवारी अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर या तरुणाने आपण आपल्या प्रेयसीचा खून केल्याची कबुली दिली आहे. लैंगिक संबंधांना नकार दिल्याने त्याने तिचा खून केला आहे.


इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, कुंद्राथूर इथं पोलिसांची टीम पेट्रोलिंग करत होती. त्यावेळी रात्री १ च्या सुमारास त्यांना३८ वर्षीय राजा रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये बसलेला दिसला. पोलिसांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, चौकशी केली. त्यानंतर त्याने पोलिसांना एका ठिकाणी नेलं. या ठिकाणी एका महिलेचा अर्धनग्न अवस्थेतला मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.


राजाने ही महिला आपली गेल्या ५ वर्षांपासूनची प्रेयसी कन्नम्मा असल्याचं सांगितलं. ती भाड्याच्या घरात राहत होती आणि एका खासगी कंपनीत मजुरीचं काम करत होती. पोलिसांनी सांगितलं की तिच्या घरी राजा दारु पिऊन आला होता. तो नशेत असतानाच त्याने तिच्याकडे लैंगिक संबंधांची मागणी केली. मात्र तिने यासाठी नकार दिल्यावर या दोघांमध्ये वाद झाले, राजाने तिला जबरदस्ती संबंध ठेवण्यास भाग पाडले.


तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कन्नम्मा रडत असतानाचे आवाज तिच्या शेजाऱ्यांनी ऐकले आणि त्यांनी राजाला तिच्या घरातून हाकलून लावलं. मात्र, काही वेळानंतर रात्री उशिरा सगळे झोपल्यानंतर राजा पुन्हा तिच्या घरी आला, दार आतून बंद करून घेतलं आणि तिचा खून केला. त्याच्या कबुलीजबाबावरून पोलिसांनी राजाला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chennai man kills lover for refusing sex caught with blood stained shirt vsk

ताज्या बातम्या