एपी, बीजिंग

चीन आणि तैवान यांच्यातील तणाव कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. जेणेकरून शांतता वाढीला मदत होईल. यासाठी दोन्ही देशांनी पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांनी तैवानचे माजी नेते मा यिंग-ज्यू यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली.

१९४९ मध्ये युद्धानंतर चीन आणि तैवानमध्ये वैर कायम आहे. तैवान हा चीनमधून वेगळा झालेला प्रांत आहे. मात्र, चीनचा तैवानवर दावा कायम आहे. तैवानच्या संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्या देशाच्या आजूबाजूच्या भागात चिनी लष्करी हालचाली वाढल्याने चिंता व्यक्त केली होती.

गेल्या काही काळापासून चीन तैवानच्या आसपासच्या भागात युद्धनौका, ड्रोन आणि लढाऊ विमाने तैनात करत आहे. मात्र, चीनच्या या कारवाया लष्करी सरावाच्या नावाखाली केल्या जात आहेत. दरम्यान, चीनचा दावा आहे की, ‘तैवान हा त्यांच्यापासून वेगळा झालेला प्रांत आहे आणि एक दिवस तो त्याच्या मुख्य भूभागाशी जोडला जाईल. त्यासाठी बळाचा वापर करावा लागला तरी चालेल.’

हेही वाचा >>>मोठी बातमी! भाजपाचे पुन्हा धक्कातंत्र; चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट, ‘या’ नव्या चेहऱ्यांना दिली संधी

या पार्श्वभूमीवर शांततावाढीसाठी चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांनी बुधवारी बीजिंगमध्ये तैवानचे माजी राष्ट्राध्यक्ष मा यिंग-ज्यू यांची भेट घेतली. ‘‘तैवान सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूचे लोक सर्व चीनी आहेत. असा कोणताही वाद नाही जो सोडवला जाऊ शकत नाही, अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर चर्चा केली जाऊ शकत नाही आणि कोणतीही शक्ती आपल्याला वेगळे करू शकत नाही,’’ क्षी यांनी मा यांना सांगितले. त्यामुळे या भेटीकडे जगाचे लक्ष लागले आहे. दोन्ही देशांतील वादावर चर्चात्मक तोडगा काढण्यासाठी ही भेट महत्वाची मानली जात आहे. चीन आणि तैवानच्या नेत्यांमधील अध्र्या शतकाहून अधिक काळातील ही पहिली बैठक आहे. त्यामुळे या बैठकीत काही ठोस निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.