भारत-चीन सीमावाद गेल्या काही दिवसांपासून धगधगता विषय आहे. त्यात आता दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा केल्याने चीनला पोटदुखी झाली आहे. यानंतर चीननं पुन्हा एका सीमेवर आक्रमक बाणा दाखवण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीने देमचुक येथील सिंधु नदीजवळ विरोध दर्शवण्यासाठी फलकबाजी आणि चीनी झेंडे फडकवले. यावेळी चीने लष्करासोबत काही नागरिकही उपस्थित होते. ही घटना ६ जुलैची आहे. या दिवशी देमचुकमधील स्थानिक नागरिक बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करत होते. यावेळी तिथे पाच वाहनं पोहोचली आणि दीड तास त्याने निषेधाचे फलक या भागात झळकावले.

दलाई लामा गेल्या अनेक वर्षांपासून भारतात राहात आहेत. त्यामुळे चीननं अनेक वेळा या प्रकरणी आपला विरोध दर्शवला आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८६ वर्षीय दलाई लामा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचबरोबर दलाई लामा यांच्याशी फोनवर बोलणं झाल्याचं जाहीररित्या सांगितलं होतं. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून आतापर्यंत पहिल्यांदाच त्यांनी याबाबत जाहीररित्या सांगितलं आहे. “दलाई लामा यांच्याशी फोनवरुन बोलणं झालं. त्यांना ८६ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना केली”, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

1195 minor girls missing from Nagpur in three years
नागपूर : उपराजधानीतून तीन वर्षांत ११९५ अल्पवयीन मुली बेपत्ता
sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर

ट्विटरने ‘या’ कारणामुळे IT राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या खात्यावरील ब्लू टिक हटवलं

तिबेट सरकारकडून लवकरच दलाई लामा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील असं सांगण्यात आलं आहे. करोना स्थिती निवळल्यानंतर ही भेट होईल असं सांगण्यात आलं आहे. मोदींनी दलाई लामा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चीन एकप्रकारे इशाराच दिला आहे. दुसरीकडे, चीनमधील कम्युनिस्ट पार्टीला नुकतीच १०० वर्षे झाली, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही शुभेच्छा दिल्या नाहीत.

योगी आम्हाला द्या.. उत्तर प्रदेशातील कोविड व्यवस्थापनचे ऑस्ट्रेलियाच्या खासदाराकडून कौतुक

एप्रिल २०२० मध्ये चीननं लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारत-चीन दरम्यान तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. यावेळी दोन्ही सैन्यदलात अनेकदा धक्काबुक्की झाल्याची प्रकरणं समोर आली होती. दोन्ही देश सीमावाद सामंजस्यपणे सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या मात्र कोणताही मार्ग निघू शकलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये चर्चेची दारं बंद आहेत.