scorecardresearch

Premium

पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर होणार इंडिया आघाडीची पुढची बैठक; लोकसभेसाठीच्या रणनीतीवर शिक्कामोर्तब होणार?

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल खूप महत्वाचे आहेत

INDIA alliance
दिल्लीत १९ डिसेंबरला 'इंडिया' आघाडीची बैठक पार पडणार आहे. ( संग्रहित छायाचित्र )

लोकसभेची चाचणी समजल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड तेलंगणामध्ये मतमोजणी सुरू आहे. सध्या हाती आलेल्या कलानुसार छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपाने आघाडी घेत काँग्रेसला धक्का दिला आहे. तर, तेलंगणात भारत राष्ट्र समितीला ( बीआरएस ) धक्का देत काँग्रेसने मुसंडी मारली आहे. अशातच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘इंडिया’ आघाडीची बैठक बोलावली आहे.

काँग्रेसनं बुधवारी ६ डिसेंबरला नवी दिल्लीत इंडिया आघाडीतील मित्रपक्षांची बैठक बोलावली आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी डीमएमके, तृणमूल काँग्रेससह इंडिया आघाडीतील मित्र पक्षांशी बैठकीबाबत संपर्क साधला आहे.

raj thakre
लोकसभा निवडणुसाठी सज्ज आहात का? राज ठाकरे यांचा भिवंडी, कल्याणमधील पदाधिकाऱ्यांना प्रश्न
Central Election Commission disclosed the appointment of Pune District Collectors
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने केला ‘हा’ खुलासा
Loksabha Election 2024
लोकसभा स्वबळावर लढण्याच्या ‘आप’च्या निर्णयानंतर काँग्रेसकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू; इंडिया आघाडीतील जागावाटपाचा तिढा वाढणार?
Interesting story of election symbols of political parties
बाटलीपासून ते पलंगापर्यंत! पाकिस्तानच्या निवडणुकीतील निवडणूक चिन्हांची चर्चा, अनेक नेते नाराज; वाचा नेमकं प्रकरण काय?

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामधील निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर ६ डिसेंबरला ही बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल खूप महत्वाचे आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये भाजपा ५३ तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे. तर, तेलंगणात काँग्रेस ६८ आणि भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) ३६ आणि भाजपाचे ८ उमेदवार आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशात भाजपा १६१ तर काँग्रेस ६६ आघाडीवर असल्याचं दिसत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपा ११२ तर काँग्रेस ७२ जागांवर आघाडीवर आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress calls for next india bloc meet on december 6 ssa

First published on: 03-12-2023 at 11:51 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×