काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. के अँटनी यांच्या मुलाने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. ए. के अँटनी यांचे पूत्र आणि केरळमधील काँग्रेस नेते अनिल अँटनी यांनी रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत आज भाजपात प्रवेश केला. यवी. अनिल अँटनी हे केरळ काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख देखील होते. दरम्यान, ए. के. अँटनी यांनी त्यांच्या मुलाच्या निर्णयाबाबत दुःख व्यक्त केलं.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार तिरुअनंतपुरम येथे माध्यमांशी बोलताना ए. के अँटनी म्हणाले की, अनिलच्या भाजपात प्रवेश करण्याच्या निर्णयामुळे माझं मन दुखावलं आहे. हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. आपल्या भारत राष्ट्राचा मुख्य आधार म्हणजे आपली एकता आणि धार्मिक सलोखा आहे. परंतु २०१४ नंतर मोदी सरकार सत्तेत आल्यापासून ते (भाजपा) पद्धतशीरपणे देशाच्या विविधतेचं आणि धर्मनिरपेक्षतेचं नुकसान करत आहेत. ते केवळ एकसमानतेवर विश्वास ठेवतात. ते देशाच्या संवैधानिक मूल्यांना उद्ध्वस्त करत आहेत.

anurag thakur statement on rahul gandhi
“राहुल गांधींचं लग्न झालं नाही, म्हणून तुमच्या मुलांची संपत्ती ते…”, अनुराग ठाकूर यांचं विधान
Pune Lok Sabha, Ravindra Dhangekar,
पुणे लोकसभा : पराभवाच्या भीतीपोटी रविंद्र धंगेकर हे आरोप करीत आहे – भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर
nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
Devrao Bhongle, Congress, BJP
भाजपचे नेते देवराव भोंगळे म्हणतात, “पराभव दिसू लागताच संभ्रमाचे राजकारण करण्याची काँग्रेसची…”

दरम्यान, “माझी निष्ठा नेहमीच नेहरू परिवारासोबत राहील”, असंही ए. के. अँटनी यांनी ठणकावून सांगितलं. अनिल अँटनी यांच्या भाजपा प्रवेशाच्या कार्यक्रमाला भाजपा नेते पीयूष गोयल, व्ही. मुरलीधरन आणि केरळचे भाजपा प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन उपस्थित होते. जानेवारी महिन्यात अनिल अँटनी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. आता त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

हे ही वाचा >> “मातोश्रीचा एफएसआय क्लिअर करणारे फडणवीस आता फडतूस कसे?” मनसे नेत्याचा उद्धव ठाकरेंना सवाल

काय म्हणाले अनिल अँटनी?

भाजपा प्रवेशानंतर अनिल अँटनी प्रसारमाध्यमांशी बोलले. अनिल अँटनी यावेळी म्हणाले की, “बऱ्याच काँग्रेस कार्यकर्त्यांना असं वाटतं की, एका कुटुंबासाठी काम करणं हा त्यांचा धर्म आहे. पण, देशासाठी काम करणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. जगात भारताला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. तर, जे. पी. नड्डा आणि अमित शाह हे समाजासाठी उत्तम काम करण्याची इच्छाशक्ती बाळगतात. आता देश मजबूत करण्यासाठी मी देखील त्यांच्यासोबत काम करणार आहे.