नुकताच कॅनडात झालेल्या एका सार्वजनिक सभेत पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यासमोर खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर भारताकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या उपउच्चायुक्तांना समन्स पाठवून या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
हेही वाचा – “कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होऊ शकतात”, अॅस्ट्राझेनेकाने न्यायालयात प्रथमच दिली कबुली
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, टोरंटो येथे खालसा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याबरोबरच विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे देखील उपस्थित होते. यावेळी भाषण करण्यासाठी पंतप्रधान ट्रुडो व्यासपीठावर येताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या आणि घोषणाबाजी सुरू केली. तर काही लोकांनी खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
हेही वाचा – पाकिस्तानी जहाजावरील अमली पदार्थ जप्त; गुजरात किनारपट्टीवर कारवाई, १४ खलाशी अटकेत
यावेळी बोलताना पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, कॅनडा सरकार देशातील शिख समुदायाच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. कॅनडातील शिख समुदायाला त्यांच्या धर्माचे आचरण करण्याचा मूलभूत अधिकार आहे. महत्त्वाचे म्हणजे ट्रूडो यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक संबंध कठीण काळातून जात आहेत. विशेषत: हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर दोन्ही देशातील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत.