वायनाड : निवडणूक रोखे म्हणजे उद्योजकांना धमकावून खंडणी घेण्याचा प्रकार आहे असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. प्रत्येक छोटया शहरात असे खंडणीखोर असतात. मात्र निवडणूक रोखे हे त्याचेच स्वरूप असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर ते मोदी करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

हेही वाचा >>> घडयाळाचे काटे उलटे फिरवू नका! मतपेटीद्वारे गुप्त मतदानाच्या पर्यायावर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

वायनाड मतदारसंघातील प्रचारात राहुल यांनी केंद्र सरकार उद्योजकांना धमकावण्यासाठी भाजप सरकारची हे डावपेच असल्याची टीका केली. देशातील काही मोजक्या उद्योजकांना मोदींनी मदत केल्याचा आरोप राहुल यांनी केला. निवडणूक रोख्याच्या मुद्दयावर मुलाखतीत पंतप्रधानांनी त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपला यातून मोठया प्रमाणात लाभ झाल्याची टीका राहुल यांनी केली. अन्य एका ठिकाणी सभेत राहुल यांनी पंतप्रधानांना देश चालविण्याची समज नसल्याची टीका केली. भाववाढ, बेरोजगारी या मुद्दयावर पंतप्रधानांनी मौन बाळगल्याचा आरोप राहुल यांनी केला. अग्निपथ योजना युवकांना अपमान करणारी असून, काँग्रेस सरकार सत्तेत आल्यावर ती रद्द करेल याचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला. भाजप तसेच संघ घटना बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

घटनाबदलाचा प्रयत्न -प्रियंका

तितबोर (आसाम)): काँग्रेस सत्तेत आल्यास आसामच्या चहा मळयातील कामगारांचे वेतन वाढवले जाईल असे आश्वासन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी दिले. जोरहट जिल्ह्यात गौरव गोगोई यांच्या प्रचारासाठी प्रियंका यांचा रोड शो झाला. या वेळी मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. विरोधकांना घटना बदलायची आहे असा दावा त्यांनी या वेळी केला.