देशभरात गेल्या २४ तासांत ६,९८४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून एकूण करोनाबाधितांची संख्या तीन कोटी ४७ लाख १०,६२८ झाली आहे. दिवसभरात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून, एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या ८७,५६२ असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने बुधवारी दिली.

’ गेल्या २४ तासांत २४७ करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या चार लाख ७६,१३५ झाली आहे. सलग ४८ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या १५ हजारांखाली नोंदली गेली आहे.

’ एकूण करोनाबाधितांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांची संख्या ०.२५ टक्के असून मार्च २०२० पासूनची ही सर्वात कमी संख्या आहे. करोनातून बरे होण्याचा दर ९८.३८ टक्के आहे. मार्च २०२० पासूनचा हा सर्वाधिक दर आहे. गेल्या २४ तासांत उपचाराधीन रुग्णांची संख्या तब्बल १,४३१ने कमी झाली आहे.

’ दैनंदिन रुग्णवाढीचा दर ०.५९ टक्के इतका नोंदला असून सलग ७२ दिवसांपासून रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे. साप्ताहिक रुग्णवाढीचा दर ०.६७ टक्के नोंदला आहे. सलग ३१ दिवसांपासून साप्ताहिक रुग्णवाढीचा दर एक टक्क्याहून कमी नोंदला गेला आहे.

’ देशभरात आतापर्यंत तीन कोटी ४१ लाख ४६,९३१ रुग्ण करोनामुक्त झाले असून मृत्युदर १.३७ टक्के आहे. देशभरात १३४.६१ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे.