सध्या जगभरात कृत्रिम बुद्धीमत्तेची (AI) जोरदार चर्चा सुरु आहे. दिवसेंदिवस त्यामध्ये नवनव्या सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेन्स (AGI)च्या विकासासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली आहे. ते ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. सध्या अस्तित्वात असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) अत्युच्च विकास म्हणून एजीआयकडे पाहिले जात आहे. दुसरीकडे तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक जागतिक कंपन्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

एजीआय म्हणजे काय?

एजीआयमुळे एखाद्या मनुष्याला करता येईल असे कोणतेही काम मशीन अथवा सॉफ्टवेअरलाही करता येईल. त्यामध्ये तर्कवितर्क, सामान्य ज्ञान, कार्यकारणभाव इत्यादी मानवी कौशल्यांचा समावेश असेल. अगदीच सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, एजीआयमुळे मशीनला मानवी बुद्धीप्रमाणेच काम करता येईल. मशीनदेखील माहीत नसलेल्या गोष्टी नव्याने शिकणे, नव्या अनुभवांमधून शिकणे आणि प्राप्त केलेली माहिती वापरात आणण्यासारख्या अनेक गोष्टी मानवाप्रमाणेच शिकू शकेल.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Ujjwal Nikam and vijay Wadettivar
हेमंत करकरेंच्या मृत्यूप्रकरणी विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पाकिस्तान सरकारला…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Prajwal Revanna Rape Victime
“मी मदतीची याचना करत होते, पण तो…”, पीडित महिलेने वाचला प्रज्ज्वल रेवण्णांच्या अत्याचाराचा पाढा
sharad pawar ajit pawar marathi news
“माझे बंधू आजारी असताना शेवटच्या काळात…”, शरद पवारांची अजित पवारांवर थेट टीका: म्हणाले…
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?

हेही वाचा : विश्लेषण: विवाह संस्कार आणि सप्तपदी अनिवार्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! हिंदू धर्मात किती प्रकारचे संस्कार महत्त्वाचे मानले गेले आहेत?

मनुष्य त्याच्या अनुभवांमधून विविध गोष्टी शिकतो. घर, शाळा वा इतर ठिकाणांमधून त्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. एखाद्या गोष्टीचे निरीक्षण करून वा लोकांशी संवाद साधून वा पुस्तके, टीव्ही अशा माध्यमांतूनही त्याची जडणघडण होते आणि त्याच्या मेंदूचा विकास होतो. त्यानंतर मनुष्याचा मेंदू विविध अडचणींवर मार्ग काढण्यासाठी या सगळ्या अनुभवांतून प्राप्त झालेल्या माहितीचा वापर करतो.

एजीआयमुळे एखादे सॉफ्टवेअर अथवा मशीनदेखील अगदी हीच क्षमता प्राप्त करू शकेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा एवढा विकास प्रत्यक्षात आणण्याचे संशोधकांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे मानवी मेंदू ज्याप्रमाणे काम करतो अगदी तसेच काम एजीआयमुळे मशीनलाही करता येऊ शकेल, या दृष्टीने संशोधक काम करीत आहेत. म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्तेचा यंत्रमानव अगदी माणसासारखाच तुमचा मित्र असेल. तो तुम्हाला काय म्हणायचे आहे ते अगदी सहजपणे समजून घेऊ शकेल, नव्या गोष्टी शिकू शकेल आणि एखाद्या समस्येवर त्याच्या बुद्धिमत्तेने उपायही काढू शकेल.

एआय आणि एजीआयमध्ये काय फरक आहे?

एआय (AI) आणि एजीआय (AGI) यामध्ये नक्कीच फरक आहे. मुख्य फरक आहे व्याप्ती आणि क्षमतेचा! एआय एखादी विशिष्ट कृती करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकेल. उदाहरणार्थ- चित्र ओळखणे, त्यावर प्रक्रिया करणे, भाषांतर करणे वा तुमच्याबरोबर बुद्धिबळासारखा खेळ खेळणे. एआयकडून ही सगळी कामे मानवापेक्षा जलद आणि अचूक गतीने केली जात असली तरीही त्याची क्षमता तेवढ्या एखाद्या कृतीपुरतीच मर्यादित राहते. दुसऱ्या बाजूला एजीआय एखाद्या कृतीपुरते मर्यादित नाही. त्याची क्षमता आणि व्याप्ती एआयपेक्षा अधिक मोठी असेल. ते अगदी मानवी बुद्धिमत्तेप्रमाणे अचूकपणे एकाच वेळी अनेक कामे करू शकेल.

त्यामुळेच एजीआयबाबतच्या घडामोडींकडे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाचे अत्युच्च शिखर म्हणून पाहिले जात आहे. संशोधकांकडून एआयच्या क्षमतांमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न आधीपासूनच केले जात आहेत. म्हणूनच नोव्हेंबर २०२२ मध्ये चॅटजीपीटीसारखे एआय माध्यम बाजारात आल्याबरोबर अल्पावधीतच इतके लोकप्रिय झाल्याचे दिसून आले. ते अगदी मानवी बुद्धिमत्तेप्रमाणेच मजकुरावर प्रक्रिया करू शकते, हेच त्यामागचे कारण आहे.

तेव्हापासून एआय हा विषय अधिक प्रमाणात चर्चेला आला. सध्या त्यामधील संशोधनाला अधिकाधिक गती देण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले जात असल्यामुळे आता दिवसेंदिवस एआयची माध्यमे अधिकाधिक विकसित होत आहेत. एजीआय हे याच एआय विकासाचे अत्युच्च शिखर ठरेल, यात शंका नाही.

ही पूर्णपणे नवी कल्पना आहे का?

नाही. ही पूर्णपणे नवी कल्पना आहे, असे म्हणता येणार नाही. २० व्या शतकात पहिल्यांदा एजीआयची संकल्पना मांडण्यात आली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक मानल्या जाणाऱ्या ॲलन ट्युरिंग यांनी आपल्या शोधनिबंधामध्ये सर्वप्रथम ही संकल्पना मांडली होती. त्यांनी ‘कॉम्प्युटिंग मशिनरी अॅण्ड इंटेलिजेन्स’ (१९५०) या शोधनिबंधामध्ये यंत्रांची बुद्धिमत्ता मोजण्यासाठी ‘ट्युरिंग टेस्ट’ नावाची नवी संकल्पना मांडली होती. ट्युरिंग टेस्टनुसार एखादे मशीन जर माणसाबरोबर माणसाप्रमाणेच संवाद साधू शकत असेल, तर ते मानवी बुद्धिमत्तेचेच प्रदर्शन करीत असल्याचे द्योतक आहे, असे सांगण्यात आले होते.

ट्युरिंग यांनी हा शोधनिबंध लिहिला तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास अजिबात झालेला नव्हता. इतकेच काय, संगणकही त्याच्या प्राथमिक अवस्थेत होता. मात्र, ट्युरिंग यांनी ही संकल्पना मांडल्यामुळे अशा प्रकारच्या यंत्रांच्या अस्तित्वाबाबतच्या चर्चांना सुरुवात झाली होती. मानवी बुद्धिमत्तेची क्षमता असणाऱ्या अशा यंत्रांच्या फायद्या-तोट्यांवरही चर्चा होऊ लागल्या.

एजीआयचा मानवासाठी काय फायदा होऊ शकतो?

तात्त्विकदृष्ट्या एजीआयचे असंख्य सकारात्मक फायदे सांगता येऊ शकतात. उदाहरणार्थ- आरोग्याच्या क्षेत्रामध्ये एजीआयचा वापर केल्यास कमी कालावधीमध्ये अचूक पद्धतीने रोगाचे निदान, उपचाराची पद्धती आणि रुग्णपरत्वे औषधोपचारही निश्चित करता येऊ शकतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या माहितीच्या विस्तृत साठ्याचे कमी कालावधीत विश्लेषण करून निर्णय घेणे ही मानवी बुद्धिमत्तेच्या पलीकडे जाणारी गोष्ट आहे. मात्र, एजीआयमुळे हे वास्तवात येऊ शकते. अगदी अर्थकारणात आणि व्यवसायांमध्येही एजीआयचा वापर प्रभावीपणे केला जाऊ शकतो. एजीआयद्वारे सद्य:स्थितीतील बाजाराचे अचूक विश्लेषण करून अंदाज वर्तविण्याचे कामही सहजतेने होऊ शकते. शिक्षण क्षेत्राचे उदाहरण घेतल्यास, एजीआयमुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या अनोख्या गरजा पूर्ण करता येऊ शकतात. प्रत्येकाची क्षमता ओळखून, त्याच्या गरजेनुसार त्याला शिक्षण देण्याची व्यवस्था अस्तित्वात आणता येऊ शकते.

हेही वाचा : विश्लेषण : जगातील ४६ टक्के दमा मृत्यू भारतात… दम्याच्या आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी काय आवश्यक?

एजीआयबाबत संशयाचे वातावरण का?

एकीकडे एजीआयचे इतके फायदे सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र त्याबाबत भीतीही व्यक्त केली जात आहे. एजीआय प्रणाली विकसित करण्यासाठी होणारा उर्जेचा वापर आणि ई-कचऱ्याच्या निर्मितीमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम हा चिंतेता विषय आहे. एजीआयमुळे रोजगारामध्येही मोठ्या प्रमाणावर घट होऊ शकते; तसेच सामाजिक आणि आर्थिक विषमतेमध्येही प्रचंड वाढ होऊ शकते, असे म्हटले जात आहे. दुसरीकडे ज्यांच्या हातात एजीआयचे नियंत्रण असेल त्यांच्या हातात इतरांपेक्षा अधिक अधिकार येऊ शकतात. असे झाल्यास, त्यामुळे नव्या प्रकारच्या समस्या आणि व्यवस्था उदयाला येऊ शकते; ज्याची आपण कल्पनाही केलेली नसेल. जर मनुष्य एजीआय तंत्रज्ञानावर अधिकाधिक विसंबून राहू लागला, तर तो आपल्या मूलभूत मानवी क्षमता आणि कौशल्येही गमावून बसण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

एजीआय मानवी क्षमतेला ओलांडून त्याच्याही पुढे जाऊ शकते, हाच एजीआयबाबतचा सर्वांत मोठा धोका आहे. असे झाल्यास, मानवाला एजीआयच्या संभाव्य कृती समजून घेणे आणि त्यांचा अंदाज वर्तविणेही कठीण होऊ शकते. अनेक साय-फाय चित्रपटांमध्ये मानवाचे यंत्रमानवांवरील नियंत्रण सुटून, ते अधिक शक्तिशाली झाल्याचे चित्रण केले गेले आहे. चित्रपटांमध्ये असे यंत्रमानव मानवी कल्याणाच्या विरोधात जाताना दिसतात. अगदी तसेच काहीसे येणाऱ्या भविष्यात वास्तवात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बीबीसीला २०१४ मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये दिवंगत प्राध्यापक स्टीफन हॉकिंग म्हणाले होते, “कृत्रिम बुद्धिमत्तेचा संपूर्ण विकास झाला, तर मानवजातीचा अंतही होऊ शकतो.” त्यामुळेच एजीआयचा विकास हा मानवी मूल्यांशी सुसंगत आणि मानवाच्या सुरक्षिततेला धरूनच व्हायला हवा. त्यासाठी अनेक विचारवंत मांडणी करताना दिसतात.