उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये हरियाणातून अपहरण केलेल्या महिलेवर धावत्या कारमध्ये बलात्कार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही ग्रेटर नोएडातीलच रहिवासी आहेत. ते व्यवसायाने चालक आहेत. या घटनेत वापरण्यात आलेली काळ्या रंगाची कार जप्त केली आहे. अटक केलेल्या आरोपींची चौकशी करण्यात येत आहे.

हरियाणातून महिलेचे अपहरण करून तिच्यावर उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेच्या तपासासाठी पोलीस उपअधीक्षक लव्ह कुमार यांनी पोलिसांची चार पथके स्थापन केली होती. नोएडा पोलीस गुरुग्राम पोलिसांचीही तपासासाठी मदत घेत होते.

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा

महिलेचे सोहना येथून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिला उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे आणून तिला दारू पाजली आणि तिच्यावर धावत्या कारमध्ये बलात्कार केला होता. या घटनेनंतर संशयित आरोपींनी तिला एका ढाब्याजवळ रस्त्यावर फेकून दिले आणि तेथून पसार झाले होते. जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले होते. तसेच तक्रारीवरून कासना पोलीस ठाण्यात कारमधील तीन अज्ञात व्यक्ती आणि एका रिक्षाचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी चार पथके स्थापन केली होती. तपास करताना पोलिसांनी गुरुग्राम आणि नोएडादरम्यानच्या टोलनाक्यांवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. तपासानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, पीडित महिला मूळची राजस्थानची आहे. दोन आठवड्यांपूर्वीच ती नोकरीच्या शोधात गुरुग्राममध्ये आली होती. सोहना येथील आपल्या नातेवाईकाकडे ती राहत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.