scorecardresearch

Premium

लैंगिक शोषण, गर्भपात आणि… दिल्लीतल्या घटस्फोटित महिलेचे IAS अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

IAS अधिकाऱ्याने ही महिला आपल्या विरोधात कट रचत आहे आणि तिने दीड कोटी रुपये घेतले आहेत असा आरोप केला आहे.

Delhi Crime News
( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ३२ वर्षांच्या एका घटस्फोटित महिलेने एका IAS अधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ही महिला मूळची राजस्थानची राहणारी आहे. तिने छत्तीसगड कॅडरच्या आयएएस अधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाचा आणि गर्भपात करायला लावल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे या महिलेविरोधात या अधिकाऱ्याने १ सप्टेंबर रोजी ब्लॅकमेलिंगचा आरोप करत FIR दाखल केली आहे. या अधिकाऱ्याने म्हटलं आहे की महिला माझ्याकडे दीड कोटी रुपये मागते आहे.

काय आहे हे प्रकरण?

जयपूरमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे की एका महिलेने दिल्ली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असून सदर महिला ही दिल्लीतल्या एका खासगी कंपनीत काम करते. ज्या अधिकाऱ्यावर तिने आरोप केले आहेत तो अधिकारी आणि या महिलेची भेट डिसेंबर २०१९ मध्ये एका कॉमन मित्राच्या मदतीने झाली. या दोघांची ओळख झाल्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. त्यावेळी या महिलेची कोर्टात घटस्फोटाची प्रक्रिया सुरु होती. महिलेने तक्रारीत म्हटलं आहे की मला या अधिकाऱ्याने लग्नाचं आश्वासन दिलं आणि माझं लैंगिक शोषण केलं. आमच्या दोघांचं नातं सुरू होण्याआधी आमचा घटस्फोट झाला होता. मार्च २०२० मध्ये लग्न करू असं सांगून या अधिकाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचं पीडित महिलेने म्हटलं आहे. आज तकने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

13 Notice to central government on doctor plea
१३ डॉक्टरांच्या याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस
Police bravery medal gadchiroli
गडचिरोली : नक्षल्यांशी मुकाबला करणाऱ्या १९ जवानांना पोलीस ‘शौर्य’ पदक, सोमय मुंडेंना राष्ट्रपती पदक
After cancellation of merger Zee Entertainment moves to NCLT against Sony Pictures economic news
विलीनीकरण रद्द झाल्यानंतर ‘झी’ची ‘सोनी’ विरोधात एनसीएलटीकडे धाव
Rahul Gandhi challenges the Assam government to file maximum cases against me
माझ्यावर जास्तीतजास्त खटले दाखल करा; राहुल गांधींचे आसाम सरकारला आव्हान

तक्रारीत म्हटल्यानुसार दोघांच्याही मित्रांना या नात्याविषयी माहिती होती. या दरम्यान मला त्याने सांगितलं की माझी IAS अधिकारी म्हणून निवड झाली की आपण लग्न करू. आमची ओळख झाली तेव्हा तो परीक्षा देत होता. त्याचा खर्चही आपण केला होता असंही या महिलेने म्हटलं आहे. तसंच त्याला अनेकदा यश आलं नाही आणि नैराश्य आलं होतं तेव्हाही आपण त्याची काळजी घेतली होती. मात्र त्याने आपली फसवणूक केल्याचं पीडित महिलेने म्हटलं आहे.

हे पण वाचा- संतापजनक! तरुणांनी गाठला क्रूरतेचा कळस; तरुणीला आधी बीफ खाऊ घातलं, मग…

धमकी देऊन गर्भपात करायला लावला

पीडित महिलेने तिच्या तक्रारीत ही बाबही नमूद केली आहे की डिसेंबर २०२२ मध्ये मी त्याच्यापासून गरोदर राहिले. त्यावेळी त्याने धमकी देऊन मला गर्भपात करायला लावला. त्यानंत तो जुलै २०२३ मध्ये शेवटचं भेटला होता. त्यावेळी त्याने मला काहीही सांगितलं नाही. त्यानंतर त्याने २१ ऑगस्ट २०२३ या दिवशी आयपीएस ऑफिसरशी लग्न केलं. त्याआधी १२ ऑगस्टला मला त्याने What’s App मेसेज करून हेदेखील सांगितलं होतं की दीड कोटी रुपयांसाठी माझ्याविरोधात केस करू नकोस.

दीड कोटी रुपये घे आणि निघून जा

मला लग्नाचं वचन देणाऱ्या IAS अधिकाऱ्याने कोर्ट मॅरेज केलं आहे हे मला माहित नव्हतं. त्यामुळे मी त्याच्या मेसेजचा फार गांभीर्याने विचार केला नाही. माझ्या घरातले लोक जातीमुळे आपल्या लग्नाला विरोध दर्शवत आहेत असं त्याने मला सांगितलं. त्यावर मी त्याला हे म्हटलं की मी तर उच्च जातीतली आहे. तर तो म्हणाला दीड कोटी रुपये घे आणि शांत राहा कारण तुझ्याशी लग्न केलं तर माझे कुटुंबीय दुःखी होती. मी पैसे मागितले नव्हते, त्यानेच मला ते दिले. मला हे माहित नव्हतं की या पैशांवरून तो माझ्यावर पुढे जाऊन आरोप करणार आहे. त्यानंतर त्याने माझ्यावर ४ कोटी रुपये मागितल्याचाही आरोप केला. मी त्याच्याशी संपर्कात होते, पण मला हे चुकूनही वाटलं नाही की तो दुसऱ्या महिलेशी लग्न करण्यासाठी हा सगळा खेळ खेळतो आहे असंही या महिलेने म्हटलं आहे.

हे पण वाचा- अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण प्रकरण : हिना खानच्या अटकेसाठी पोलीस करतायेत टाळाटाळ?, शिनाच्या वडिलाला अटक

IAS अधिकाऱ्याने केली FIR

एकीकडे या महिलेने इतके सगळे आरोप केलेले असताना IAS अधिकाऱ्यानेही तिच्या विरोधात FIR केली आहे. माझ्या विरोधात या महिलेने कट रचला आहे. वकिलातर्फे माझ्या विरोधात खोटा खटला ती दाखल करू इच्छिते. मी तिच्या कुटुंबालाही याबाबत सांगितलं आहे मात्र त्यांनी कुणीही तिला असं करण्यापासून रोखलेलं नाही. त्यामुळे तिच्या कटात तिचं कुटुंबही सहभागी असू शकतं असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. ही महिला तिचा घटस्फोट झाल्यापासून मला त्रास देते आहे असंही या अधिकाऱ्याने सांगितलं. तर फोन घेतला नाही तर मी आत्महत्या करेन अशीही धमकी तिने दिल्याचं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Delhi woman accuses chhattisgarh cadre ias officer of sexual harassment and abortion scj

First published on: 12-09-2023 at 09:20 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×