इजिप्तमधील लष्करपुरस्कृत सत्ताधाऱ्यांकडून मुस्लीम ब्रदरहूडचे कंबरडे मोडण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. मंगळवारी ब्रदरहूडचे सर्वोच्च धर्मोपदेशक मोहम्मद बादेई यांना अटक करण्यात आली. मोर्सी समर्थक आंदोलकांना मार्गदर्शन करून त्यांच्या आंदोलनाची तीव्रता कायम राखण्यात बादेई यांचा वाटा होता. या अटकेमुळे आंदोलन भरकटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.आंदोलनाची सारी सूत्रे आता मुस्लीम ब्रदरहूडचा उपनेता महमूद इज्जत याच्या हाती देण्यात आली आहेत. गेल्या जून महिन्यात ब्रदरहूड विरोधकांनी केलेल्या आंदोलनात आठ जणांचा मृत्यू झाला होता. या हत्येच्या तसेच हिंसाचारास उत्तेजन दिल्याचा आरोप बादेई यांच्यावर ठेवण्यात आला आहे.