पुणे : एका ८५ वर्षीय व्यक्तीला तीन महिन्यांपासून सतत तीव्र खोकला सुरू होता. त्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेतले; परंतु आराम मिळत नव्हता. सततच्या खोकल्यामुळे त्यांना रात्री झोपही येत नव्हती. अखेर डॉक्टरांनी त्यांच्या फुफ्फुसाचे सीटी स्कॅन केले. त्या वेळी आतमध्ये काही तरी वस्तू अडकल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ही वस्तू बाहेर काढल्यानंतर ती हळकुंड असल्याचे समोर आले.

या रुग्णाला खोकल्याचा त्रास होता. त्याने अनेक ठिकाणी उपचार घेतले; परंतु, मूळ आजाराचे निदान न झाल्याने खोकला थांबत नव्हता. त्याची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला पिंपरीच्या डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी रुग्णाच्या फुप्फुसाचे सीटी स्कॅन केले. त्यामध्ये रुग्णाच्या फुप्फुसात काही तरी वस्तू अडकली असल्याचे आढळून आले. श्वसनविकार विभागाचे प्रमुख डॉ. एम. एस. बरथवाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रुग्णाची ब्रॉन्कोस्कोपी केली.

Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Pavitra Jayaram Dies In a Car Accident
प्रसिद्ध अभिनेत्री अपघातात जागीच ठार, दुभाजकावर आदळलेल्या कारला बसने दिली धडक, तिघे जखमी
pune house rent marathi news, pune house rent increasing marathi news
पुण्यात घरभाडे वाढता वाढता वाढे…! जाणून घ्या सर्वाधिक घरभाडे कोणत्या भागात…
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
Viral video: Man assaults wife on Chennai flyover
VIDEO: बायकोला पुलावरुन खाली फेकत होता तेवढ्यात पोलीस…महिलेचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
Shriya Pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin Pilgaonkar hrc 97
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
gurucharan singh sodhi last location found
गुरुचरण सिंगचं शेवटचं लोकेशन सापडलं, बेपत्ता झाल्यावर तीन दिवस ‘इथं’ होता अभिनेता, एटीएममधून पैसे काढले अन्…

हेही वाचा : पुण्यात घरभाडे वाढता वाढता वाढे…! जाणून घ्या सर्वाधिक घरभाडे कोणत्या भागात…

ब्रॉन्कोस्कोपी करताना रुग्णाच्या फुप्फुसात अडकलेल्या वस्तूभोवती पिवळ्या रंगाचे थर तयार झाल्याचे दिसले. त्यामुळे ते काढणे कठीण बनले होते. चिमटा आणि विशेष साधनांचा वापर करून वैद्यकीय पथकाने इजा न करता फुप्फुसामध्ये अडकलेली वस्तू बाहेर काढली. ती वस्तू कोणती हे समजण्यास डॉक्टरांना सुरुवातीला वेळ लागला. मात्र ती वस्तू कापल्यानंतर त्याचा रंग पिवळसर निघाला. रुग्णाकडे विचारणा केली असता, त्याने खोकला कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी तोंडात हळकुंडाचा तुकडा ठेवल्याचे सांगितले. हळकुंडाचा तुकडा झोपेच्या वेळी चुकून रुग्णाच्या श्वसननलिकेत शिरला असावा आणि तेथून फुप्फुसात गेला असावा, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला.

हेही वाचा : बासमती तांदळाची विक्रमी निर्यात; जाणून घ्या कोणत्या देशांना झाली निर्यात

रुग्ण असह्य खोकल्यापासून आराम मिळावा यासाठी हळकुंडाचे तुकडे किंवा लवंगाचा देठ तोंडात ठेवतात. हे तुकडे अनवधानाने श्वसननलिकेत गेल्याने रुग्णांना गंभीर स्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे असे प्रकार टाळावेत.

डॉ. एम. एस. बरथवाल, प्रमुख, श्वसनविकार विभाग, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल