पीटीआय, अथेन्स : भारत आणि ग्रीसने आपले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करून धोरणात्मक भागीदारी वाढवणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. तसेच २०३० पर्यंत दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार दुप्पट करण्याचे आणि स्थलांतरासंबंधी करार करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्यामध्ये विविध मुद्दय़ांवर व्यापक चर्चा झाली.

नरेंद्र मोदी हे गेल्या ४० वर्षांत ग्रीसच्या दौऱ्यावर जाणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. बैठकीनंतर संयुक्त निवेदनामध्ये मोदी यांनी सांगितले की, संरक्षण आणि सुरक्षा, पायाभूत सुविधा, कृषी, शिक्षण आणि नवीन व उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रामधील सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्या अनुषंगाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर संस्थात्मक चर्चा करण्यासंबंधी दोन्ही देशांदरम्यान सहमती झाली आहे.

two new US-India agreements
भारत आणि अमेरिकेने संरक्षण करारावर केली स्वाक्षरी; काय आहेत दोन नवीन करार? याचा भारताला कसा फायदा होणार?
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Why are some elements in Bangladesh holding India responsible for the floods
विश्लेषण : पूरस्थितीसाठी बांगलादेशातील काही घटक भारताला जबाबदार का ठरवत आहेत?
Prime Minister Narendra Modis visit to Poland and Ukraine is for the future
मोदींची पोलंड, युक्रेन भेट ‘मध्यस्थी’साठी नव्हे… भवितव्यासाठी!
Loksatta vyaktivedh Army Chief General Sundararajan Padmanabhan Terrorist attack army
व्यक्तिवेध: जनरल (नि.) एस. पद्मानाभन
wfi to challenge delhi hc
उच्च न्यायालयाच्या निर्णयाने देशातील कुस्तीगिरांचे भवितव्य धोक्यात; भारतीय कुस्ती महासंघ आदेशाला आव्हान देणार
independence day 2024
अग्रलेख: स्वातंत्र्य… आपले आणि त्यांचे!
Sheikh Hasina Bangladesh Protests
हसीना यांचा मुक्काम वाढला; लंडनला जाण्यामध्ये ‘तांत्रिक अडचणी’; गरज असेल तोपर्यंत पाहुणचाराची भारताची तयारी

बदलत्या जागतिक परिस्थितीत, विशेषत: युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ग्रीस यांनी एकत्रितरित्या विविध आव्हानांना सामोरे जाण्याचे ठरवले आहे असे ग्रीसचे पंतप्रधान मित्सोटाकिस यांनी सांगितले. याबरोबरच, डिजिटल देयक पद्धती, जहाज वाहतूक, औषधनिर्माण क्षेत्र, पर्यटन, संस्कृती आणि लोकांचा एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क या मुद्दय़ांवरही दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी हे ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. परिषद पार पडल्यानंतर ते शुक्रवारी ग्रीसच्या दौऱ्यावर गेले. तिथे त्यांनी ग्रीसचे अध्यक्ष कॅटेरिना सॅकेलारोपुलो यांचीही भेट घेतली.