किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. हजारो शेतकरी त्यांचे ट्रॅक्टर, ट्रक घेऊन दिल्लीच्या वेशीवर धडकले आहेत. देशभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चंडीगडमध्ये केंद्र सरकारने चर्चा केली. परंतु, चर्चेच्या पहि्या फेरीत कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केलं आहे. तसेच या शेतकऱ्यांनी १६ फेब्रुवारी रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, शेतकरी शंभू सीमेवर दाखल झाले आहेत. परंतु, पोलिसांनी शेतकऱ्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. तर शेतऱ्यांनी मागे हटण्यास नकार दिला. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याचबरोबर पोलिसांनी शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. दुसऱ्या बाजूला सिंघू सीमेवरही पोलिसांनी नाकेबंदी केली आहे.

शेतकरी सकाळी १० वाजता पंजाबच्या फतेहगड साहिब येथे दाखल झाले होते. तिथून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केली. शेतकरी आता शंभू सीमेवर दाखल झाले आहेत.

हे ही वाचा >> शेतकऱ्यांना रोखण्यासाठी व्यूहरचना; किमान आधारभूत किंमतीसाठी कायदा करण्याची मागणी

चंदीगडमध्ये सोमवारी सायंकाळी केंद्रीय मंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार कुठल्याही प्रकारचा तोडगा काढू शकलं नाही. या बैठकीनंतर शेतकरी-कष्टकरी संघर्ष समितीची सरचिटणीस सर्वनसिंह पंढेर म्हणाले, या सरकारला केवळ आमचं आंदोलन पुढे ढकलायचं आहे. चर्चेसाठी त्यांचे दरवाजे यापुढेही खुले असतीलच. परंतु, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी इच्छाशक्ती हवी. सरकारची इच्छा असेल तर ते एमएसपी कायदा आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्या मान्य करू शकतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers protest police fire tear gas disperse protesters at punjab haryana shambhu border asc
First published on: 13-02-2024 at 13:12 IST