लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराची याआधीची भाजपची पार्श्वभूमी पाहता छत्तीसगड, दिल्ली, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांतील भाजप नेत्यांचा निवडणुकीच्या प्रचारात अभिनेते, क्रिकेटर यांना आमंत्रीत करण्यावर भर असायचा परंतु, यावेळीचे चित्र बदलले आहे.
या राज्यांतील भाजप नेते आपल्या प्रचारात नरेंद्र मोदींना कसे आणता येईल? यासाठी प्रयत्न करत आहे. याराज्यांतील प्रत्येक राज्यापातळीवरील भाजप नेता मोठ्या सभा आणि रॅली आयोजित करून त्यासाठी मोदींना आमंत्रीत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार मोदींच्या दिनक्रमातील तारखा मिळविण्याचा प्रयत्न भाजप नेते करत असल्याचे भाजप सुत्रांनी सांगितले आहे.
पक्षाच्या वरिष्ठ अधिकारी म्हणाला, “भाजपच्या राज्यपातळीवरील नेत्यांना यावेळी प्रचारासाठी कोणी अभिनेता, अभिनेत्री किंवा क्रिकेटर नको. त्यांच्यासाठी आता नरेंद्र मोदीच ‘हीरो’ झाले आहेत.”  
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यांतील सभा आणि रॅलींच्या तारखा निश्चित झाल्या नसल्या तरी, २ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या महिन्याभराच्या कालावधीत नरेंद्र मोदी २५ निवडणुक रॅलींमध्ये भाजपच्या प्रचारासाठी उपस्थिती दर्शविणार आहेत.