टोक्यो : जपानचे माजी परराष्ट्र मंत्री फुमिओ किशिदा यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वपदाची निवडणूक बुधवारी जिंकली असून ते आता पुढील पंतप्रधान असणार आहेत. त्यांच्यापुढे करोना साथीमुळे घसरलेली अर्थव्यवस्था व अमेरिकेबरोबर ठोस आघाडी  याबरोबरच अनेक प्रादेशिक प्रश्नांची आव्हाने आहेत. किशिदा यांनी आधीचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांची जागा घेतली. सुगा यांनी सप्टेंबरमध्ये कार्यभार घेतला होता त्याला वर्ष पूर्ण होत असतानाच पायउतार व्हावे लागत आहे. लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतेपदाची निवडणूक झाली असून त्यात त्यांची निवड झाल्याने संसदेत सोमवारी त्यांची पंतप्रधानपदी निवड होणार आहे, कारण संसदेत त्यांचा पक्ष व मित्र पक्षांचे प्राबल्य आहे. किशिदा  यांनी नेतृत्वपदाच्या लढतीत लसीकरण मंत्री टारो कोनो यांचा पराभव केला असून पहिल्या टप्प्यात ते एकाच मताने आघाडीवर होते. याशिवाय दोन महिलांसह चार उमेदवार होते, त्यांना बहुमत मिळाले नाही.

prajwal revanna case
Scandal: “प्रज्ज्वल रेवण्णाला भगवान कृष्णाचाही रेकॉर्ड मोडायचा होता”, काँग्रेसच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान
After canceling India visit Tesla CEO Elon Musk entered China
भारत भेट रद्द केल्यानंतर, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क चीनमध्ये दाखल
Former RBI Governor D Subbarao
विकासाचे गुलाबी चित्र रंगवण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेवर यूपीए सरकारचा दबाव! सुब्बाराव यांचा मुखर्जी, चिदम्बरम यांच्यावर आरोप
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप