करोना उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा अवैध साठा, वापर आणि वाटप केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीर यांच्या फाऊंडेशनवरचा आरोप आता सिद्ध झाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने याविषयीची माहिती दिली आहे.

गौतम गंभीर फाऊंडेशनने करोनाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या फॅबिफ्लू या गोळ्यांचा अवैध पद्धतीने साठा, वाटप आणि वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. तो आता सिद्ध झाला आहे.

भारतीय औषध नियंत्रक मंडळानं न्यायालयासमोर आपला अहवाल सादर केला आहे. यापूर्वी जेव्हा गौतम गंभीर फाऊंडेशनला क्लिनचिट देण्यात आली होती. या संघटनेवर आणि औषध विक्रेत्यांवर त्वरीत कारवाई केली जाईल आणि इतर अशा गोष्टी समोर आणल्या जातील असंही औषध नियंत्रक मंडळाकडून सांगण्यात आलं.

आणखी वाचा- VIDEO: लाँग कोविड म्हणजे काय? तो अधिक धोकादायक आहे का?

आम आदमी पक्षाचे आमदार प्रवीण कुमार हेही अशाच प्रकारच्या गुन्ह्यामध्ये दोषी आढळले आहेत. पूर्वी औषध नियंत्रक मंडळाने सादर केलेल्या अहवालानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीरच्या फाऊंडेशनला आणि प्रवीण कुमार यांना क्लिनचिट दिली होती. न्यायमूर्ती विपीन संघी आणि जसमीत सिंग यांच्या विभागीय खंडपीठानं सोमवारी या प्रकरणातला नवा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

त्याचबरोबर आम आदमी पक्षाच्या आमदार प्रीती तोमर यांच्या विरोधातही असाच गुन्हा नोंदवून त्यांचा तपास कऱण्याचे आदेशही न्यायालयाने औषध नियंत्रक विभागाला दिले.

आणखी वाचा- दिलासादायक….सलग सातव्या दिवशी नव्या बाधितांचा आकडा दोन लाखांच्या आत

नेते करोनाच्या उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांचा अशा प्रकारे साठा आणि वाटप कसं काय करु शकते, असा सवाल उपस्थित करणाऱ्या एका जनहित याचिकेनंतर ही न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाली.