वॉशिंग्टन : एका महिलेची मानवी तस्करी करून तिला कर्ज फेडण्यापोटी मजुरीसाठी भाग पाडल्याप्रकरणी अमेरिकेतील जॉर्जिया येथील एका ‘मोटेल’च्या भारतीय व्यवस्थापकाला ५७ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. न्यायालयीन कागदपत्रांनुसार, ७१ वर्षीय श्रीश तिवारी या भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या स्थायी नागरिकाने २०२० मध्ये जॉर्जियाच्या कार्टर्सव्हिले येथे ‘बझटेल मोटेल’चे व्यवस्थापन सुरू केले होते.

हेही वाचा >>> भारतीय वंशाच्या व्यवस्थापकाचा अमेरिकन फूटबॉल क्लबला १८३ कोटींचा गंडा, लुटलेले पैसे जुगार, आलिशान गाड्यांवर उधळले

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

न्याय विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, तिवारीने महिलेला एका मोटेलमध्ये राहण्यासाठी खोली दिली होती. ही महिला पूर्वीपासून बेघर होती तसेच गतआयुष्यात अंमली पदार्थाचे (हेरॉईन) सेवन करत होती. व्यसनाधीनतेमुळे तिच्या मुलाचा ताबा तिच्याकडून काढून घेण्यात आला होता, हे तिवारीला माहीत होते. तिवारीने पीडितेला वेतन आणि एक सदनिका देऊन तिला वकील देऊन तिला तिच्या मुलाचा ताबा मिळवून देण्यास मदत करेल असे आश्वासन दिले. सरकारी वकिलांनी आरोप केला, की तिवारीने पीडितेच्या ‘मोटेल’मध्ये येणारे पाहुणे आणि कर्मचाऱ्यांबरोबर पीडितेच्या संवादावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. फिर्यादींच्या आरोपानुसार तिवारीने पीडितेला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. न्यायालयाने तिवारीला दोषी ठरवून त्याला ५७ महिन्यांचा कारावास आणि ४० हजार डॉलरचा दंड सुनावला.

Story img Loader