scorecardresearch

Premium

भारतीय वंशाच्या व्यवस्थापकाचा अमेरिकन फूटबॉल क्लबला १८३ कोटींचा गंडा, लुटलेले पैसे जुगार, आलिशान गाड्यांवर उधळले

आरोपी अमित पटेलचे वकील अ‍ॅलेक्स किंग म्हणाले, माझ्या आशिलाला त्याच्या कृत्याची लाज वाटतेय आणि त्याला याप्रकरणी माफी मागायची आहे.

Amit Patel
आरोपीने क्लबच्या पैशाने टेस्ला मॉडेल ३ सेडानसारख्या आलिशान गाड्या खरेदी केल्या आहेत. (Image via Canva)

भारतीय वंशाच्या एका व्यक्तीवर अमेरिकेत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय वंशाच्या व्यवस्थापकावर अमेरिकेतील प्रसिद्ध फूटबॉल क्लबला २.२० कोटी डॉलर्सचा (जवळपास १८३ कोटी रुपये) गंडा घातल्याचा आरोप आहे. या व्यक्तीने फूटबॉल क्लबला कोट्यवधी डॉलर्सचा गंडा घालून ते पैसे स्वतःसाठी वापरले आहेत. या पैशातून त्याने आलिशान गाड्या आणि महागड्या वस्तू खरेदी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अमित पटेल असं या आरोपीचं नाव असून तो जॅक्सनविले जग्वार्स फूटबॉल क्लब ऑफ अमेरिकाचा आर्थिक व्यवस्थापक होता.

अमित पटेल हा २०१८ मध्ये या फूटबॉल क्लबचा आर्थिक व्यवस्थापक म्हणून रुजू झाला आणि त्याने दोन वर्षे या पदावर काम केलं. यंदा फेब्रुवारी महिन्यात क्लबने त्याला नोकरीवरून काढून टाकलं. तसेच त्याच्याविरोधात जॅक्सनविले जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली. पटेलविरोधात दाखल केलेल्या दस्तावेजांनुसार अमित पटेलवर आरोप आहे की त्याने क्लबच्या पैशांचा स्वतःसाठी वापर केला आहे. पटेल हा क्लबचा एकमेव प्रशासक होता. या पदावर असताना त्याने संघातील खेळाडूंसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हर्च्युअल क्रेडिट कार्डचा वापर त्याच्या खासगी खरेदीसाठी केला.

Shubman Gill won the hearts of netizens
शुभमन गिलने जिंकले नेटकऱ्यांचे मन! चाहत्याच्या इंस्टाग्राम रीलवर कमेंट करत दिला मोलाचा सल्ला, Post Viral
Marco Troper death
यूट्यूबच्या माजी सीईओंच्या मुलाचा वसतीगृहात आढळला मृतदेह, कारण अद्याप अस्पष्ट
MS Dhoni jersey number
“त्या दिवशी आई-वडिलांनी…”, धोनीने सांगितलं ७ नंबरची जर्सी का निवडली? चाहत्यांकडून ‘Thala for a reason’चा ट्रेंड
pune commissioner warned police personnel for taking fine during traffic jam
पुणे: पोलीस आयुक्तांचा वाहतूक पोलिसांना इशारा; म्हणाले, ‘चिरीमिरी घ्याल तर…’

अमित पटेल याने क्लबच्या पैशाने टेस्ला मॉडेल ३ सेडान कार, निसान पिकअप ट्रक, ९५ हजार डॉलर्स इतकी किंमत असलेलं लग्झरी घड्याळ आणि गुंतवणुकीसाठी क्रिप्टोकरन्सी खरेदी केली होती. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास एफबीआयकडे सोपवला आहे.

हे ही वाचा >> “पैशांनी भरलेली कपाटं, दोन दिवसांपासून मोजणी सुरू”, पंतप्रधान मोदी म्हणाले, “नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहून…”

जुगारामुळे क्लबची फसवणूक

दरम्यान, आरोपी अमित पटेलचे वकील अ‍ॅलेक्स किंग म्हणाले, माझ्या आशिलाला त्याच्या कृत्याची लाज वाटतेय आणि त्याला याप्रकरणी माफी मागायची आहे. पटेल याला जुगाराचं व्यसन आहे. या व्यसनामुळेच त्याने फूटबॉल क्लबची फसवणूक केली. फूटबॉल क्लबचे पैसे त्याने जुगारात गमावले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian american amit patel stole 22 million usd from american football club asc

First published on: 08-12-2023 at 17:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×