प्रसिद्ध उर्दू कवी, शायर, गीतकार गुलजार आणि संस्कृत पंडित रामभद्राचार्य या दोघांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ निवड समितीने ही नावं जाहीर केली आहेत. ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी या दोघांची निवड करण्यात आली आहे. PTI ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार २०२३ साठी या दोघांना निवडण्यात आलं आहे. गुलजार यांना २००२ मध्ये उर्दूतल्या साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार, २००४ मध्ये पद्मभूषण पुरस्कार तर २०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. हिंदी सिनेसृष्टीत त्यांचं मोठं योगदान आहे. रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे उर्दू कवी अशी गुलजार यांची ओळख आहे. तर रामभद्राचार्य यांनी १०० हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. तसंच रामभद्राचार्य हे प्रसिद् हिंदू अध्यात्मिक नेतेही आहेत. चित्रकूट येथईल तुलसी पीठाची स्थापना त्यांनी केली आहे.

हे पण वाचा- “दोन प्रतिज्ञा पूर्ण झाल्या आता पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी आम्ही…”, स्वामी रामभद्राचार्य महाराजांचं विधान

कोण आहेत गुलजार?

गुलजार यांचं पुर्ण नाव गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा असं आहे. १८ ऑगस्ट १९३६ मध्ये गुलजार यांचा पंजाबमधील दीना येथे झाला होता. आता दीना हे शहर पाकिस्तानमध्ये आहे. फाळणीनंतर गुलजार यांचं कुटुंब अमृतसरमध्ये आलं होतं. त्यानंतर त्यांनी मुंबई गाठली आणि इकडेच स्थायिक झाले होते.

कोण आहेत जगद्गुरू रामभद्राचार्य?

जन्म झाल्यावर दोन महिन्यांत जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी दृष्टी गमावली होती. रामभद्राचार्य यांना १०० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांना २२ भाषांचे ज्ञान आहे. जगद्गुरू रामभद्राचार्य यांनाही पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. जगद्गुरू रामभद्राचार्य यांना भारत सरकारने २०१५ ध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.