Israel Hamas War Update in Marathi : इस्रायल विरुद्ध हमास युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत हजारो नागरिकांचे प्राण गेले आहेत. दोहोंकडून तुफान हल्ले होत असल्याने इस्रायल आणि पॅलेस्टाईन देशातील नागरिकांचे बळी जात आहेत. तसंच इस्रायलने गाझा पट्टीवर आक्रमणाला सुरुवात केल्यानंतर तिथं मानवतावादी सुविधांचीही वानवा झाली आहे. मुलभूत गरजांसाठीही नागरिकांची ससेहोलपट होत आहे. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यप एर्दोगन यांनी मोठा दावा केला आहे.

“हमास ही दहशतवादी संघटना नसून ती एक मुक्ती संघटना आहे, जी आपल्या भूमीचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करत आहे, असं तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यप एर्दोगन यांनी म्हटलं आहे. ते तुर्कीच्या संसदेत बोलत होते. इस्रायल आणि हमासने आता तत्काळ युद्धविराम करावे. तसंच, शाश्वत शांततेसाठी मुस्लीम राष्ट्रांनी एक होऊन काम केलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केली. गाझावरील हल्ले थांबवण्यासाठी इस्रायलवर दबाव टाकावा, अशी विनंतीही एर्दोगन यांनी जागतिक शक्तींना केली.

Rohini Khadse Raksha Khadse
रोहिणी खडसे भाजपात जाणार?, रक्षा खडसेंच्या आवाहनावर प्रतिक्रिया देत म्हणाल्या…
Tamil Nadu news M. K. Stalin
तमिळनाडूत यंदा तिरंगी लढतीची शक्यता; द्रमुक, अण्णाद्रमुक अन् भाजपामध्ये सामना होणार
donald trump hush money trial marathi news
विश्लेषण: ट्रम्प यांच्याविरोधातील ‘हश मनी’ खटला काय आहे? ट्रम्प यामुळे अडचणीत येतील का?
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद

हेही वाचा >> “…तर अमेरिका गप्प बसणार नाही”, संयुक्त राष्ट्र सभेत इराणला दिला थेट इशारा; इस्रायल-हमास युद्ध विस्तारणार?

मानवतावादी मदतीसाठी रफाह सीमा गेट उघडे ठेवले पाहिजे आणि दोन्ही बाजूंमधील ओलिसांची देवाणघेवाण तातडीने पूर्ण करावी, असंही एर्दोगन म्हणाले. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबविण्यास संयुक्त राष्ट्रांच्या अक्षमतेबद्दलही त्यांनी निराशा व्यक्त केली.

नेमकं काय घडतंय?

इस्रायल व हमासमधील युद्ध अद्याप चालूच असून हमासचे दहशतवादी माघार घेण्यास तयार नाहीत. यूएनकडून पुरवण्यात येणारी जीवनावश्यक सामग्री गाझा पट्टीत जाऊ देण्यास इस्रायलनं परवानगी दिली असली, तरी अद्याप गाझा पट्टीतील बॉम्बहल्ले व हवाई हल्ले चालूच आहेत. आता जमिनीवरून गाझा पट्टीत हल्ला करण्याचं नियोजन इस्रायलनं केलं असून हमासचा पूर्णपणे खात्मा करण्याचा निर्धार इस्रायलनं स्पष्ट केला आहे.