Premium

हमासच्या क्रौर्याची परिसीमा; इस्रायली तरुणीच्या अर्धनग्न मृतदेहाची काढली धिंड; व्हिडीओमुळे दहशतवाद्यांचे अत्याचार आले जगासमोर!

हमासच्या दहशतवाद्यानी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात काही नागरिकांना ओलीस ठेवून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जात असल्याचं समोर आलं आहे.

hamas attack on israel women deadbody paraded naked
इस्रायल हल्ल्यामध्ये हमास दहशतवाद्यांच्या क्रौर्याची परिसीमा! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम/सोशल व्हायरल)

Israel Palestinian Hamas War: हमास या दहशतवादी संघटनेकडून इस्रायलवर शनिवारी सकाळीच रॉकेट हल्ले करण्यात आले. यापाठोपाठ इस्रायलनं युद्धाची घोषणा करत गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. गाझा पट्टीच्या सीमेलगतच्या भागांमध्ये जवळपास ५ हजार रॉकेट्स हमासकडून लाँच करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या हल्ल्यांमध्ये आत्तापर्यंत २२ इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून शेकडो नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. यादरम्यान, इस्रायलच्या सीमेत घुसखोरी केलेल्या हमासच्या दहशतवाद्यांच्या क्रौर्याचे पुरावे देणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विचलित करणारा व्हिडीओ व्हायरल

हमासच्या दहशतवाद्यांच्या क्रौर्याचा दाखला देणारा असाच एक विचलित करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही दहशतवादी एका तरुणीचा अर्धनग्न मृतदेह एका कारच्या मागच्या बाजूला ठेवून त्याची धिंड काढत असल्याचं दिसत आहे. काही दहशतवाद्यांनी या तरुणीच्या मृतदेहावर पाय ठेवले आहेत. काहीजण मृतदेगावर थुंकत आहेत तर काही मृतदेहाला मारहाण करत आहेत.

“ना मोहीम, ना गोळीबार…हे युद्ध आहे”, हमासच्या हल्ल्यानंतर नेतान्याहूंनी ठणकावलं; म्हणाले, “त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी…!”

व्हिडीओत दिसणारे दहशतवादी हमासचे असून मृत तरुणी इस्रायली असल्याचं सांगितलं जात आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतील भागात घुसखोरी केल्यानंतरचा हा व्हिडीओ असल्याचंही सांगितलं जात आहे. (या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून दृश्य विचलित करणारी असल्याने इथे समाविष्ट करण्यात आलेला नाही.)

हमासच्या क्रौर्याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल (फोटो – सोशल व्हायरल स्क्रीनशॉट)

यासह काही ठिकाणी रॉकेट हल्ला झाल्याचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. रॉकेट हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्ध्वंस झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

एकीकडे हमासकडून झालेल्या रॉकेट हल्ल्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत, तर दुसरीकडे इस्रायलनं हमासच्या तळांवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आक्रमकपणे युद्धाला सुरुवात झाल्याचं या व्हिडीओंवरून दिसत आहे.

“ना मोहीम, ना गोळीबार…हे युद्ध आहे”, हमासच्या हल्ल्यानंतर नेतान्याहूंनी ठणकावलं; म्हणाले, “त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी…!”

नागरिकांसह इस्रायली सैनिकांचंही अपहरण!

दरम्यान, गाझा पट्टीच्या सीमेलगतच्या इस्रायलमधील भागातल्या काही नागरिकांना हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यासह जवळपास ३५ इस्रायली सैनिकही हमास दहशतवाद्यांच्या ताब्यात असल्याचं बोललं जात आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हे युद्ध असल्याची घोषणा केली असून आक्रमकपणे इस्रायली भूमीवरून हमासच्या दहशतवाद्यांना निपटून काढण्याचे आदेश त्यांनी इस्रायली सैन्याला दिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hamas palestini terrorist rocket attack on israel women paraded naked viral video pmw

First published on: 07-10-2023 at 18:49 IST
Next Story
रशिया-युक्रेन युद्धात उत्तर कोरियाची उडी? किम जोंग-उन यांच्याकडून व्लादिमीर पुतिन यांना युद्धसामग्रीचा पुरवठा