scorecardresearch

Premium

डॉक्टर तरुणीची आत्महत्या, हुंडा म्हणून BMW कार, १५ एकर जमीन देता न आल्याने लग्न रद्द; नैराश्यातून उचललं पाऊल

डॉ. तरुणीच्या कुटुंबाने केलेल्या आरोपानंतर या तरुणीच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

kerala doctor dies by suicide
डॉ. शहाना असं या तरुणीचं नाव आहे (फोटो फायनान्शिअल एक्स्प्रेस)

२६ वर्षांच्या डॉक्टर तरुणीने लग्नातली हुंड्याची मागणी पूर्ण न करता आल्याने आत्महत्या केली आहे. हुंड्याची मागणी या तरुणीचं कुटुंब पूर्ण करु शकलं नाही म्हणून या डॉक्टर तरुणीने हा टोकाचं पाऊल उचललं आहे. केरळच्या तिरुवनंतपुरम या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. डॉ. शहाना असं या तरुणीचं नाव आहे. ही तरुणी तिरुवनंतपुरमच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून सर्जरी या विषयाच पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती.

पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराला घेतलं ताब्यात

पोलिसांनी या प्रकरणी तरुणीच्या कुटुंबाच्या जबाबानंतर तरुणीच्या प्रियकराला ताब्यात घेतलं . या प्रकरणात त्याची चौकशी सुरु आहे. मुलीच्या प्रियकराच्या घरातल्या हुंड्यात ज्या ज्या गोष्टी मागितल्या त्या मागण्या पूर्ण करता येणं शक्य नाही याचा तणाव घेऊन डॉ. शहाना नावाच्या या तरुणीने तिचं आयुष्य संपवलं आहे.

delivery boy was robbed pune
पुणे : कोयत्याच्या धाकाने डिलिव्हरी बॉयला लुटले
bombay hc quashes fir against college student for rash driving that killed stray dog
वाहनाखाली चिरडून भटक्या श्वानाचा मृत्यू; आरोपी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम नको, न्यायालयाकडून गुन्हा रद्द
online Fraud with a person
अमरावती : इंदिरा-सेस ॲप डाऊनलोड केले आणि पाहता पाहता ८४ लाख गमावले…
mbmc started demolishing unauthorized structures in naya nagar under huge police protection
गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर मीरा रोडमध्ये पालिकेची कारवाई, नयानगरमधील अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात

डॉ. शहानाच्या कुटुंबाचे आरोप काय?

डॉ. शहाना यांच्या कुटुंबाने आरोप केले आहेत की तिचा प्रियकर डॉ. रुवैस याच्या कुटुंबाने हुंड्यात १५० ग्रॅम सोनं, १५ एकर जमीन आणि बीएमडब्ल्यू कार मागितली होती. आम्ही ती मागणी पूर्ण करु शकत नाही हे आम्ही त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर डॉ. रुवैसने आणि त्याच्या कुटुंबाने लग्न मोडलं. ज्यानंतर डॉ. शहानाने टोकाचं पाऊल उचललं. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार डॉ. रुवैसने या तरुणीला म्हणजेच डॉ. शहानाला बराच त्रास दिला आणि हुंड्यासाठी तगादा लावला होता. त्याला कंटाळूनच तिने आत्महत्या केली. स्थानिक वृत्तानुसार या मुलीची सुसाइड नोटही मिळाली आहे. त्यात सगळ्यांना फक्त पैसा प्रिय असतो असा उल्लेख आहे.

या प्रकरणानंतर केरळच्या आरोग्य मंत्री वीणा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी अहवाल सादर करण्यासही सांगितलं आहे. त्याचप्रमाणे राज्य अल्पसंख्याक आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पी. सतीदेवी डॉ. शहाना यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Her wedding cancelled over bmw car gold demand kerala doctor dies by suicide scj

First published on: 07-12-2023 at 15:35 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×