चेहरा आणखी सुंदर दिसावा यासाठी तरुण-तरुणी वेगवेगळे उपाय करतात. कोणी घरगुती उपाय करून सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करतं तर कोणी थेट डॉक्टरांकडे जाऊन शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय स्वीकारतं. मात्र शस्त्रक्रियेचा हा निर्णय कधीकधी जीवावार बेतू शकतो. असाच एक प्रकार हैदराबादमध्ये घडलाय. लग्न अवघे आठवड्यावर आलेले असताना तरुणाने मोहक हास्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र या शस्त्रक्रियेदरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मोहक हास्याच्या हव्यासापोटी या तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार २८ वर्षीय लक्ष्मी नारायण विंजाम या तरुणाचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला आहे. चेहऱ्यावरील हास्य आणखी खुलावे, स्मितहास्य आणखी मोहक व्हावे म्हणून त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जात होती. हैदराबादमधील ज्युबली हिल्स परिसरात असलेल्या एफएमएस इंटरनॅशनल डेन्टल क्लिनिकमध्ये १६ फेब्रुवारी रोजी ही शस्त्रक्रिया करण्यात येत होती. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyderabad 28 year old man dies while surgery for enhance smile ahead of wedding prd
First published on: 20-02-2024 at 12:22 IST