गेल्या महिन्यापासून अमेरिकेत बेपत्ता असलेला २५ वर्षीय भारतीय विद्यार्थी क्लीव्हलँडमध्ये मृतावस्थेत आढळून आला आहे. मोहम्मद अब्दुल अरफाथ, असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मोहम्मद अब्दुल अरफाथ हा मुळचा हैदराबाद येथील होता. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या होण्याची आठवड्याभरातली ही दुसरी घटना आहे. तसेच या वर्षातली ११ वी घटना आहे.

हेही वाचा – VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!

NRI shot
Crime News : पंजाबमध्ये खुलेआम गोळीबार; विदेशातून परतलेल्या व्यक्तीवर पत्नी-मुलांसमोरच झाडल्या गोळ्या
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Two cases of sexual assault by teachers in Mumbai
मुंबईत शिक्षकाकडून लैंगिक अत्याचाराच्या आठवड्याभरात दोन घटना; पाच महिन्यात पोक्सोचे ५०९ गुन्हे
child marriage in america
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत बालविवाहाची प्रथा? २४ वर्षांत ३ लाख बालविवाह झाल्याचं उघडकीस
State Bank of india lending rate hiked for third consecutive month
स्टेट बँकेच्या कर्जदरात सलग तिसऱ्या महिन्यात वाढ
Dengue zika vaccine in India for adults
डेंग्यू, झिकापासून आता बचाव! भारतात लस विकसित; दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यास मंजुरी
Monsoon Alert Rains will be active again in central India
मान्सून अलर्ट : मध्य भारतात पुन्हा सक्रिय होणार
Mid Day Meal News
Mid Day Meal : मुख्याध्यापकांनी केली दिव्यांग विद्यार्थ्याला नॉनव्हेज खाण्याची सक्ती, तक्रारीनंतर निलंबन

न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासानेही अरफाथच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. “मोहम्मद अब्दुल अरफाथ हा गेल्या महिन्यापासून बेपत्ता होता. स्थानिक पोलीस त्याचा शोध घेत होते. या शोधमोहिमेदरम्यान क्लीव्हलँड येथे त्याचा मृतदेह आढळून आला” अशी पोस्ट न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाकडून एक्स या समाजमाध्यमावर करण्यात आली. तसेच अरफाथच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी आम्ही स्थानिक पोलिसांच्या संपर्कात असल्याचेही दुतावासाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – ‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते म्हणाले…

मोहम्मद अब्दुल अरफाथ हा क्लीव्हलँड विद्यापीठात माहिती तंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होता. तो ७ मार्चरोजी बेपत्ता झाला. तेव्हापासून त्याच्याशी संपर्क तुटल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. तसेच १९ मार्चरोजी अरफाथच्या कुटुंबीयांना एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. यावेळी अरफाथचे अपहरण झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसेच त्याच्या सुटकेसाठी १२०० डॉलरची खंडणीही मागण्यात आल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली. अरफाथच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्रही लिहिले होते. कोणत्याही परिस्थितीत अरफाथला भारतात परत आणण्याची विनंती त्यांनी या पत्रद्वारे केली होती.