भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सजिर्कल स्ट्राईक केल्यानंतर देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे. भारताने केलेल्या धडक कारवाईचे सर्वच पक्षांनी कौतूक करत समर्थनही केले आहे. सोशल मीडियावर भारतीय लष्कर व केंद्र सरकारचे मोठ्याप्रमाणात कौतूक सुरू असताना नॅशलन कॉन्फरस पक्षाने मात्र हा दुर्दैवी हल्ला असल्याचे म्हणत भारताने युद्धाला सुरूवात केल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
जम्मू येथे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मुस्तफा कमाल यांना पत्रकारांनी भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हे मत व्यक्त केले. भारताने शांतता व मैत्रीचा पुल बांधण्याची गरज होती. मात्र आपण वेगळ्याच मार्गाने जात आहोत असे म्हणत एखाद्या देशाची सीमा ओलांडणे म्हणजे युद्धाला सुरूवात करण्यासारखे असल्याचा आरोप ही त्यांनी केला. सोशल मीडियावर मुस्तफा कमाल यांच्यावर मात्र टीका करण्यात येत आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या खंबीर भूमिकेचे कौतूक सुरू असताना नॅशनल कॉन्फरन्सने घेतलेल्या या भूमिकेवर मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

https://twitter.com/ANI_news/status/781410808303525888