दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (NCR) जवळपास १०० शाळांना बॉम्ब हल्ल्याची धमकी मिळाली आहे. आज ( बुधवारी) पहाटे ४ वाजता या शाळांना ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात असून खबरदारीचा उपाय म्हणून शाळेचा परिसर खाली करण्यात आला आहे. याठिकाणी बॉम्ब स्कॉड देखील तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – केजरीवालांना निवडणुकीपूर्वी अटक का करण्यात आली? सर्वोच्च न्यायालयाचा ईडीला सवाल

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, धमकीचा ईमेल मिळालेल्या शाळांमध्ये मयूर विहार येथील मदर मेरी स्कूल, द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूल, चाणक्यपुरी येथील संस्कृती स्कूल, वसंत कुंज येथील दिल्ली पब्लिक स्कूल आणि साकेतमधील एमिटी स्कूल यांचा समावेश आहे.

यासंदर्भात दिल्लीचे पोलीस उपायुक्त देवेश कुमार महला यांनी सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. दिल्लीतील शाळांना पहाटे धमकी मेल मिळाल्याची तक्रार आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही संपूर्ण शाळांची झडती घेतली. मात्र, या ठिकाणी आम्हाला कोणीही बॉम्ब सदृष्य वस्तू आढळली नाही. मात्र, याप्रकरणाचा तपास सुरू आहे, नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In delhi around 100 schools receive bomb threats central agencies probe on spb
Show comments