माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी पाकिस्तानमधील नागरिक भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचे म्हटले होते. तसेच भारत सरकारला पाकिस्तानच्या प्रश्नावर तोडगा काढायचा असेल तर तो चर्चेतून काढावा लागेल, असे नवे विधान अय्यर यांनी शुक्रवारी केले. अय्यर म्हणाले, “पाकिस्तान सरकारशी आपले मतभेत असू शकतील, पण त्यात त्या देशातील लोकांचा काय संबंध? पाकिस्तान सरकारचा सामना करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईकसारखे धाडस करण्याची आवश्यकता नसून एका मंचावर येऊन पाकिस्तानी लोकांशी संवाद साधण्याची गरज आहे. मागच्या १० वर्षांत अशी संवाद साधण्याची हिंमत आपण दाखवलेली नाही.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सावरकरांनीच देशाचे धर्माच्या आधारे विभाजन केले: मणिशंकर अय्यर

पाकिस्तानी लोक भारताची सर्वात मोठी संपत्ती

संवाद आणि दहशतवाद एकत्र येऊ शकत नाही, अशी सबब आपल्याकडून पुढे केली जाते. पण भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची परिस्थितीच दहशतवादाला खतपाणी घालत आहे, असेही अय्यर म्हणाले. १२व्या गोवा कला आणि साहित्य महोत्सवातील ‘मेमोयर्स ऑफ अ सेक्युलर फंडामेंटलिस्ट’ या विषयावर बोलत असताना अय्यर पुढे म्हणाले की, पाकिस्तानी लोक ही पाकिस्तानमधील भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे.

कराचीमध्ये भारताचे कौन्सुल जनरल म्हणून काम करतानाचा अनुभव आणि त्यानंतरच्या पाकिस्तान दौऱ्यांची आठवण सांगताना अय्यर म्हणाले की, भारताने धर्मनिरपेक्षतेचा मार्ग स्वीकारल्यामुळे आपला देश योग्य मार्गावर चालला होता. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने धर्माला राष्ट्राचा आधार बनविण्याचा विचार केला. मात्र त्यांचा हा विचार पूर्णपणे चुकला. या निष्कर्षापर्यंत मी गेल्या काही वर्षांत आलो आहे.

‘मणिशंकर अय्यर यांच्या मुलीने माफी मागावी किंवा घर सोडावं’, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविरोधात उपवास ठेवल्याप्रकरणी नोटीस

भारताचे भविष्यही पाकिस्तानसारखे होईल

गेल्या काही वर्षांपासून भारत अधिकाधिका धर्मनिरपेक्षविरोधी बनत चालला आहे असे सांगताना अय्यर म्हणाले की, खेदाने म्हणावे लागेल की, विविधतेतील एकता एका पर्यायी विचारामुळे पराभूत होत आहे. समानता आणणे हा तो पर्यायी विचार आहे. पण हे तत्त्व भारतात चालणार नाही. जर आपण पाकिस्तानने निवडलेल्या मार्गावर चालायचे ठरविले तर भारताचे भविष्यदेखील पाकिस्तानसारखेच असेल, असा इशाराही अय्यर यांनी दिला.

भारतात जातीयवादाचा उदय

अय्यर पुढे म्हणाले की, भारतातील सर्वात मोठे परिवर्तन म्हणजे जातीयवादाचा झालेला उदय. पूर्वी काही निधर्मी वगळता एक गट स्वत:च्या स्वार्थासाठी जातीयवादी झालेला होता. पण आता गेल्या १० वर्षांत स्वार्थासाठी जातीयवादी झालेल्यांची संख्या वाढली असून निधर्मी अगदीच अल्पसंख्य ठरले आहेत. माझ्या आयुष्यात मी पाहिलेले हे सर्वात मोठे परिवर्तन आहे.

विश्लेषण : सोमनाथ मंदिराचा संक्षिप्त इतिहास; राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिराच्या उद्घाटनासाठी नेहरूंनी का केला होता विरोध?

पतंप्रधान मुख्य पुजाऱ्याच्या भूमिकेत दिसले

सरकारचा कोणताही धर्म नसावा, असेही अय्यर म्हणाले. यासाठी त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा दाखला दिला. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी पुर्नबांधणी केलेल्या सोमनाथ मंदिराचे उदघाटनाला उपस्थित राहू नये, असे नेहरुंनी सांगितले असल्याची आठवण त्यांनी करून दिली. यापुढेच अय्यर म्हणाले की, पण सध्याचे आमचे पंतप्रधान एका धार्मिक कार्यक्रमात मुख्य पुजारी असल्यासारखे वागत आहेत. हिंदू धर्माशी सुसंगत कार्यक्रम नसल्यामुळे या कार्यक्रमाला चारही शंकराचार्यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला होता. यावरून हे दिसून आले की, हिंदुत्व हे राजकीय तत्त्वज्ञान आहे आणि हिंदू धर्म ही एक धार्मिक जीवनशैली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In last ten years except for closet seculars all indians are communal says mani shankar aiyar kvg
Show comments